Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुबोध भावेला लाभलीयेत अथांग प्रेम करणारी ‘वेडी माणसं’; बर्थडे गिफ्ट पाहून अभिनेता झाला नि:शब्द!!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Subodh bhave
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा चमचमता तारा अभिनेता सुबोध भावे याचा गेल्या महिन्यात ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. यानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाच. शिवाय त्याच्यासाठी काही खास गिफ्टदेखील पाठवली आहेत. जेव्हा सुबोधने हि गिफ्ट्स उघडली तेव्हा त्याच्याकडे आभार व्यक्त करण्यासाठी काहीसे शब्दच अपुरे पडू लागले. या क्षणाचा सुंदर व्हिडीओ बनवून त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या चाहत्यांचे त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

सुबोध भावेने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला पाठवलेल्या खास भेटवस्तू त्याने दाखविल्या आहेत. मुख्य म्हणजे या वस्तू त्यांनी स्वतः तयार करून पाठवल्या आहेत. त्यामुळे या खास आहेत. हा व्हिडिओ शेयर करत सुबोधने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘वेडी माणसं…. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझा फॅनक्लब काहीतरी विलक्षण भेट पाठवत असतो. त्या सुंदर अशा भेटीसाठी अप्रतिम कल्पना निवडतो आणि पूर्ण करायला प्रचंड मेहनत घेतो. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान वेळ मला भेट देता यावी म्हणून कारणी लावतो. या वर्षीची भेट सुध्दा तितकीच विलक्षण आहे.’

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

‘व्यापार खेळ असतो तसा त्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या कलेच्या प्रवासातले टप्पे निवडून त्याचा एक बैठा खेळ बनवलाय. त्यात मी काम केलेले विविध चित्रपट, मालिका, नाटकं आहेत. सोंगट्या आहेत, पैसे आहेत, फासे आहेत आणि खेळाचे नियमसुध्दा आहेत. त्याचबरोबर एक पोस्टपेटी आहे. त्यांच्या पत्रांनी भरलेली. काय बोलू??????? निशब्द!!!!!!!! खरं म्हणजे आत्ता माझ्या डोळ्यासमोर माझे सर्व निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार आणि पडद्यामागचे कलाकार सर्व आले. त्यांच्यामुळे मला चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्यामुळे दृष्ट लागेल असा फॅनक्लब मिळाला. माझ्या फॅनक्लबमधील सर्वांना मनापासून धन्यवाद! इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल. तुम्हा सर्वांवर नितांत प्रेम! तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. (आता आम्ही सगळे एकत्र बसून तुम्ही दिलेला हा माझ्या करीअरचा बोर्डगेम खेळू).. प्रेम..’ अशाप्रकारे सुबोधने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags: Fans LoveInstagram Postmarathi actorsubodh bhaveViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group