हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट विश्वातील अत्यंत मोठे नाव अभिनेता सुबोध भावे याने आजवर कित्येक मनाला भावलेल्या आणि कायमस्वरूपी स्मरणात राहिलेल्या भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून सुबोधने नेहमीच उत्तम पात्रे साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लोकमान्य, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर या भूमिकांनी तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं.
याशिवाय ऐतिहासिक कलाकृतीच्या माध्यमातून सुबोधने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली आणि त्यावर शिवभक्तांनी प्रेमसुद्धा केले. असे अनेक बायोपिक सुबोधने गाजवले असताना आता पुढील काळात तो कोणताही बायोपिक करणार नसल्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने एक मोठी घोषणा करीत म्हटले आहे कि, ‘ माझ्या बाप जन्मात आता यापुढे मी बायोपिक करणार नाही. आता शुट करत असलेला हा शेवटचा बायोपिक चित्रपट असेल…’ सुबोधने अशी कठोर भूमिका का घेतली असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर बरेच चाहते सुबोधला विविध प्रश्न विचारात आहेत. माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘हर हर महादेव’ चित्रपटावर काही आरोप केले जात असून ते गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे सुबोधने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन गेल्या महिन्याभरापासून मोठा वाद सुरु आहे. या चित्रपटामध्ये शिवकालीन इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे. सरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला होता. दरम्यान त्यांनी केवळ ‘हर हर महादेव’ नव्हे तर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरदेखील सडकून टीका केली होती. संभाजीराजेंनी ‘हर हर महादेव’ टीका करताना म्हटले होते कि, ‘या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. त्यांनी आता यापुढील काळात कोणताही ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकार आणि इतिहास अभ्यासकांची वेगळी समिती नेमावी आणि त्यांना चित्रपट दाखवून तो प्रदर्शित केला जावा, असे मत संभाजी राजेंनी व्यक्त केले होते.
Discussion about this post