हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आजकाल नाटकाच्या वाढत्या दरांमुळे प्रेक्षकांची कमी जाणवू लागली होती. प्रेक्षकांची अडचण लक्षात घेता दामलेंनी लढवली युक्ती आणि चक्क ती यशस्वी सुद्धा झाली.
प्रायोगिक तत्त्वावर गडकरी रंगायतनमध्ये ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या दोन्ही नाटकांचे प्रयोग होते. दरम्यान बाल्कनी तिकिटाचा दर केवळ 100 रुपये ठेवला होता. नाटय़गृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी प्रशांत दामलेंनी हा प्रयत्न करून पहिला. त्यांच्या प्रयत्नाला जवळपास 70 टक्के प्रेक्षकांनी बाल्कनीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
प्रशांत दामले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बाल्कनीचा फोटो शेअर करीत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे अनेक दिवसांनंतर तुमच्यामुळे काल गडकरी नाट्यगृहाची बाल्कनी उघडली. बाल्कनीत बसलेल्या दोन मुलांना पाहून त्यांच्या पालकांचा अभिमान वाटतो असेही दामलेंनी म्हटले आहे.
यापूर्वी प्रयोगासाठी बाल्कनीचा तिकीट दर 300 रुपये आणि 200 रुपये होता. त्यामुळे दामलेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे कि, त्यांच्या दोन्ही नाटकाच्या मुंबई, ठाणे, वाशी, कल्याण आणि डोंबिवलीतील प्रयोगांचे बाल्कनीचे तिकीट 100 रुपये असेल. तर पुणे, चिंचवड आणि नाशिकमधील प्रयोगांचे बाल्कनीचे तिकीट 149 रुपये असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक आनंदे सहकुटुंब नाटक पाहायला जाणार हे निश्चित.
Discussion about this post