हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका चांगली टीआरपी ओढताना दिसत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरी या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील हि पात्र अभिनेता मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांनी अनुक्रमे साकारली आहेत.
सध्या या मालिकेतील विविध ट्विस्ट अतिशय रंजक असून हि मालिका लवकरच निरोपाच्या वाटेकडे मार्गस्थ होणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असल्यामुळे मालिकेचा शेवट कसा असेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. चला तर जाणून घेऊया मालिकेच्या शेवटाविषयी..
मुळात ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे. त्यामुळे पुढे आपण पाहणार आहोत कि, गौरी प्रेग्नेंट असते आणि त्यामुळे शिर्के पाटलांच्या वाड्यात आनंद येतो. त्यातच जयदीप आणि गौरी यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. मात्र, एव्ह्ढ्यातच माईसाहेब (वर्ष उसगांवकर) घरी परत येतात आणि पुन्हा सगळं काही आधीसारखं करतात.
गौरीची गुडन्यूज ऐकून जयदीपदेखील निर्णय बदलतो. पुढे माईसाहेब गौरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करणार. यातच दुसरीकडे शालिनी आणि तिची कारस्थानी टीम कट रचणार. पुढे गौरी एका गोंडस मुलीला जन्म देईल असेही दाखवले जाणार.
यानंतर गौरी बाळाचे संगोपन करण्यासाठी निर्णय घेईल कि, कंपनीत जाणार नाही आणि सगळे अधिकार जयदीपला देईल. तर दादासाहेब जयदीपला सांगतील कि, तु कंपनी सांभाळ आणि गौरी बाळाला सांभाळेल. उदयच्या हाती कंपनी दिली तर तो विकून खाईल. त्यामुळे तुम्ही ती जबाबदारी घ्या. यानंतर माई दादा नातीचे लाड करतील. दरम्यान शालिनीला मुलं नसल्याने ती गौरीवर जळेल. तर दुसरीकडे जयदीप गौरीला स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र गौरी त्याला मला दुसरं काहीतरी करायचं आहे असे सांगेल.
तुला काय करायचं आहे..? असे जयदीप विचारेल आणि मग गौरी सांगेल मला वकील व्हायचं आहे. हा निर्णय जयदीप माई दादांना सांगेल आणि ते आनंदी होतील. पुढे गौरी वकिली शिकायला ३ वर्ष मुंबईला जाईल. हा मालिकेतील ३ वर्षाचा गॅप दाखवला जाईल. यानंतर थेट गौरी ही वकील होऊन मुंबईहून कोल्हापूरला परतेल. तिच्या आनंदात सगळे आनंदी होतील पण शालिनी चिडेल आणि मग ती गौरीला नव्हे तर तिच्या मुलीला त्रास देण्याच ठरवते. शालिनी एका गुंडाला पैसे देऊन गौरीच्या मुलीला पळून न्यायला सांगते.
या प्रसंगामुळे गौरी जयदीप खूप घाबरतील. मात्र मल्हारने शालिनीचे बोलणे ऐकल्यामुळे तो सर्वाना खरं सांगतो. यानंतर तो गौरीच्या बाळाला परतही घेऊन येतो. पुढे मल्हार शालिनीला घटस्फोट देतो आणि तिला माहेरी पाठवून देतो.
शिवाय देवकीही चांगल्या मार्गाला लागून कारस्थान थांबवताना दिसेल. मग पुढे या मालिकेत तिघेही भाऊ एकत्र येऊन नंदिनी गृह उद्योग सांभाळतात. तर असा असेल या मालिकेचा गोड शेवट. याला काही अवकाश असला तरीही मालिकेने सांगतेकडे मार्गस्थ केले आहे हे प्रेक्षकांना पचविणे अवघड जाणार आहे.
Discussion about this post