Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुणीही सोम्यागोम्या गुडविलची माती करतोय..; पत्नीसाठी अपमानास्पद भाषा पाहून सुमित राघवनची सटकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अतिशय गाजत असलेले आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हळूहळू सर्वव्यापी होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा भडीमार केला असता वानखेडेंची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर चांगलीच कडाडल्याचे दिसत आहे. दरम्यान या प्रकरणाच्या संदर्भाने प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन यांच्यात ट्विटरवर शाब्दिक वॉर सुरु आहे. याची सुरुवात झाली ती सुमितची पत्नी चिन्मयीच्या एका पोस्टवरून झाली. मला अनावर इच्छा झाली होती, एखादी सणसणीत पोस्ट टाकायची. पण ती ‘टिकली’नाही, अशी पोस्ट चिन्मयीने अधोरेखित असा टोला लगावला होता. तिच्या याच पोस्टवर शेफाली वैद्य यांनी अख्खी फेसबुक पोस्ट केली. ते टिकलीचं राहू द्या, पण थोडा सणसणीतपणा जरा क्रांती रेडकरबद्दल दाखवा की, की त्या विषयावर बोलताना धडधडीत शेपूट घातली? असा सवाल त्यांनी केला आणि मग काय सुमित राघवन चांगलाच वैतागला.

३०/३५ वर्ष कष्टाने,कुठल्याही गॉडफादर शिवाय आज आम्ही थोडसं नाव कमावलं आहे. तुमच्या एका बेजबाबदार पोस्ट मुळे आज कोणीही सोम्यागोम्या त्या goodwill ची माती करतोय. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे.
पोस्ट जोडत आहे,त्यात माझंही उत्तर आहे.
दिवाळीच्या शुभेच्छाhttps://t.co/kppABiWTjH

— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) October 27, 2021

त्याचे झाले असे कि, शेफाली यांनी वर्तमानपत्रातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची टिकली न लावलेली जाहिरात पाहिली आणि त्याचा विरोध केला होता. हिंदूंच्या सणात विवाहित स्त्रिया वा लहान मुली टिकली लावून सण साजरे करतात. मात्र मॉडेलच्या कपाळावर टिकली नाही जी दिवाळीसाठी दागिन्यांची जाहिरात करत आहे हे शेफाली याना सहन झाले नाही आणि त्यांनी ‘नो टिकली, नो बिसनेस’ हा हॅशटॅग सुरू केला. हा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय झाला होता. यानंतर चिन्मयीने नाव न घेता एक टोला लगावताच शेफाली यांनी फेसबुकवर प्रहार केले. मात्र, त्यांची भाषा पाहून सुमितची सटकली आणि त्याने चांगलाच लेखिका बाईंचा समाचार घेतला.

ह्या त्या महान बाई! सगळ्यांना अक्कल शिकवतात. आम्ही कलाकार काय ह्यांच्या बागेतल्या भाज्या खातो की आमच्या बायका/नट्या ह्यांच्या साड्या आणि टिकल्या लावतात?
तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे ,जरूर द्या. पण ही कुठली भाषा? भ्याड,कातडीबचाऊ आणि शेपूटघालू जमात? Agenda नका रेटू. https://t.co/9ZobdjZw7q

— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) October 27, 2021

सुमितने लिहिले कि, काही दिवसांपूर्वी क्रांतीला असभ्य भाषेला सामोरं जावं लागलं आणि त्याबद्दल मी ट्विट केलं होतं आणि क्रांतीला पूर्ण पाठिंबा दिला होता. काल पासून माझ्या बायकोला देखील तशाच भाषेला तोंड द्यावं लागतंय. कारण शेफाली वैद्य ताई, तुम्ही चिन्मयीच्या एका पोस्टला भलतंच वळण दिलं. दुसरी गोष्ट, कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शिवाय जी भाषा तुम्ही स्वत: चिन्मयीसाठी वापरली आहे ती आक्षेपार्ह आहे. शेफाली ताई,मी एवढंच म्हणू इच्छितो.

हे आहे माझं ट्विट. माझा पाठिंबा. मला द्यावासा वाटला मी दिला. ज्याला जे वाटेल ते करायची मुभा आहे की ते सुद्धा ह्या शेफाली ताईच ठरवणार? https://t.co/I1VDKAhtt8

— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) October 27, 2021

काल तुमच्या अनुयायांनी अतिशय घाणेरड्या भाषेचा प्रयोग करून तिला प्रचंड त्रास दिलाय. क्रांती बद्दल कळवळा आहे ते बरोबरच आहे परंतु तुम्ही एका शब्दाने चिन्मयीसाठी तुमच्या अनुयायांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध केला का? काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणा-यांमध्ये? विचारसरणी आणि मुद्दे वेगळे असू शकतात ताई. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे.

तर यावर शेफाली वैद्य म्हणाल्या, चिन्मयी सुमीत हयांची माझे नाव न घेता माझ्यावर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर बराच गदारोळ झाला. त्यानंतर आपल्या असहाय्य पत्नीच्या सहाय्याला स्वत: सुमीत राघवन धावून आले. त्यांच्या ह्या पत्नीपरायणतेबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांना कळावं म्हणून त्यांची कॉमेंट इथे देत आहे. त्यांचा मुख्य मुद्दा होता, नुकतेच त्यांच्या पत्नीचे वडील गेले त्यामुळे त्या बिघडलेल्या मन:स्थितीत आहेत म्हणून त्यांनी माझ्यावर नाव न घेता काहीही टीका केली तरी मी ती मनावर नाही घ्यायला पाहिजे. आता राघवन दांपत्य काही शाहरुख खान वगैरे नाहीयेत की ज्यांच्या कौटुंबिक अपडेट्स आपल्याला इच्छा नसली तरी पहावे लागतात. त्यांच्या घरात काय झालं ते मला कळायची शक्यताच नव्हती कारण मी दोघांनाही फॉलो करत नाही.

पुढे, ही चिन्मयीची पोस्ट मला दिसली तीही कुणी तरी इनबॉक्स मध्ये पाठवलं म्हणून. त्यात त्यांनी मला टॅग करून टीका केली असती तरी मी विषय सोडून दिला असता. पण नाव न घेता टीका करणा-या लोकांबद्दल मला आदर नाही. तरीही मी समजू शकते की वडील गेल्याच्या दु:खात माणसं सैरभैर होतात, आणि काहीबाही लिहू शकतात. त्यामुळे चिन्मयी सुमित ह्यांच्या भावनांचा आदर राखून मी माझी पोस्ट डिलीट करते आणि माझ्यापुरता हा वाद संपवते.

फक्त माझी सुमित राघवन ह्यांना विनंती आहे की त्यांनी चिन्मयी राघवन ह्यांना सांगावं की, ह्याापुढे माझ्यावर नाव न घेता त्यांना कुजकट टीका करावीशी वाटली तर त्यांनी आज जसं केलंय तशी स्वत:च्या भिंतीवरचे कॉमेंट आधी बंद करून आणि मला ब्लॉक करून करावी म्हणजे काय होईल, टीका माझ्यापर्यंत पोचणारच नाही आणि मग त्यांचा आपल्या पत्नीच्या सहाय्याला धावून यायचा आणि दर वेळेला नवे व्हिक्टिम कार्ड शोधायचा त्रास तरी वाचेल!

Tags: Chinmayi sumeetFacebook PostKranti RedkarSameer WankhedeSumeet RaghvantwitterWriter Shefali Vaidya
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group