Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता अडकणार लग्नबंधनात; प्री- वेंडिंगचे फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 1, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sumit Pusawale
0
SHARES
14.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक मालिका म्हणजे ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’. या मालिकेतील संत बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे सध्या सोशल मिडियावर बरेच सक्रिय दिसतात. यामुळे अनेकदा चाहत्यांसाठी ते आपले विविध फोटो, व्हिडीओ तसेच रिल्स शेअर करत असतात. तर सुमित यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. ती अशी कि येत्या काळात लवकरच सुमित विवाह बंधनात अडकणार आहेत. अलीकडेच त्यांचा साखरपुडा पार पडला असून त्याचं प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा झालं. जे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

अभिनेता सुमित पुसावळे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या होणाऱ्या पत्नीसोबतचे काही क्षण शेअर केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमित यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी एक पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. सोबतच होणाऱ्या पत्नीचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होत कि, ‘जेव्हा तुम्ही पळून जायला खूप उशीर करता.’

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

माहितीनुसार, सुमित यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव मोनिका असे आहे. अलीकडेच २७ नोव्हेंबर रोजी सुमित यांनी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो दाक्षिणात्य वेषभूषेतील असून प्री वेडींगचा आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तिचा हात पकडणं हा तर एक बहाणा होता, खरं तर नशिबाच्या रेषांना एकमेकांशी जोडायचं होतं.’

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये सुमित आणि मोनिका दोघेही एका तळ्यात बांधलेल्या मचाणीवर दिसत आहेत. तर पाण्यात एक होडी दिसतेय आणि सुमित गुडघ्यावर बसून आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज करत आहेत. हा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने सुमित यांना विशेष पसंती दिली आहे. पण याआधी झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ शिवाय ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमध्येही ते काही महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. सध्या त्यांचं फॅनफॉलोईंग जबरदस्त आहे आणि त्यांचे चाहते त्यांना नवरदेव म्हणून पहायला उत्सुक झाले आहेत.

Tags: Balumamachya Navane ChangbhalInstagram Postmarathi actorSumit PusavaleViral PhotosViral VideoWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group