हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गांवर खड्डे भरणीची कामं सुरु केली आहेत. मात्र, पावसाची चूक असावी कि तो येतो आणि बुजवले खड्डे पुन्हा मोठे करून जातो. आत्ताची महामार्गांची अवस्था अशीच आहे. काम केलेले रस्ते सुद्धा पुन्हा पावसामुळे खड्ड्यांचा थाट मिरवत आहेत. यामुळे खड्डे भरणीच्या कामावर भला मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडुन देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा.ह्या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे.दिलासा द्या. @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @narendramodi @AmitShah #महाराष्ट्र #खड्डेमुक्त_रस्ते
— Gaurav Patil (@gauravpatil2000) July 21, 2022
ठाण्यातून मुंबई – नाशिक आणि जुना आग्रा मार्गावरील कशेळी- काल्हेर मार्गावर पावसामुळे भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होते आणि नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. या संदर्भात नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत आणि यातीलच एक ट्विट रिट्विट करून अभिनेता सुमीत राघवनने मुख्यमंत्र्यांना कळवळून विनंती करणारे ट्विट केले आहे.
त्याच झालं असं, एका त्रस्त नागरिकाने सोशल मीडियाचा आधार घेत एक ट्विट केले आहे आणि आपला संताप व्यक्त करीत सरकारकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या,’. हेच ट्विट शेअर करत सुमीत राघवनने एक ट्विट यासोबत जोडले आहे. ज्यामध्ये त्याने शिंदे भाजप सरकारला विनंती केली आहे.
अनुमोदन. @CMOMaharashtra आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो. https://t.co/P1QXQBiDsg
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 22, 2022
सुमितने लिहिलंय कि, ‘अनुमोदन. आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो,’. हे ट्विट सुमीतने मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केले आहे. त्याच काय आहे, कशेळी- काल्हेर मार्ग हा ठाणे, कल्याण या भागात वाहतूक करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणे आवश्यक आहे.
#मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे व रस्त्यांचे सिमेंट #काँक्रिटीकरण द्वारे सुधारणांचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आढावा घेतला. लवकरात लवकर #खड्डे भरून वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी @mybmc ला केल्या. pic.twitter.com/Za9aP2pbme
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2022
यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एमएमआरडीसी या प्राधिकरणांना स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र बुजवलेले खड्डे पुन्हा असे रस्ते सजवणार असतील तर प्रगतीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे.
Discussion about this post