हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘लावणी’ हा लोककलेचा एक असा प्रकार आहे ज्याला महाराष्ट्राची शान म्हणून दर्जा प्राप्त आहे. या दर्जासाठी कित्येक कलावंतांनी आपल्या जिव्हाचं पाणी केलं आहे. त्यामुळे या कलेचा योग्यप्रकारे गौरव व्हायलाचं हवा. त्याचे सुयोग्य सादरीकरण हाच सन्मान. पण सबसे कातिल गौतमी पाटीलची अदा काही औरच आहे. गौतमी लावणीच्या नावाखाली अश्लिल नृत्य सादर करून चुकीचा पायंडा घालत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. यातच आता प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुन्हा एकदा कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता केवळ कलेला सन्मान मिळायला हवा हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
सुरेखा पुणेकर यांनी बोलताना कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचा रोख कुणाकडे होता हे काही वेगळे सांगायला नको. सांगलीतील गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमानंतर सापडलेला मृतदेह हि घटना सगळ्यांनाच माहित आहे. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची अफाट गर्दी जमली होती आणि अशावेळी ज्या गावात हा कार्यक्रम होता तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचं, तसेच आवारातील झाडांचे उपस्थितांनी मोठे नुकसान केले. या कार्यक्रमात एकंदरच हुल्लडबाजी पहायला मिळाली. यामुळे गौतमी चर्चेत आली होती. तिची लावणी आणि तिचा नृत्य सादर करण्याचा अंदाज यावरून लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांनी आपला संतापही व्यक्त केला होता. त्याआधी सुरेखा पुणेकर यांच्यासह अन्य काही लावणी कलावंत महिलांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर आता पुन्हा एकदा लावणी आणि त्याचे सादरीकरण या विषयी बोलताना सुरेखा ताईंनी अचूक निशाणा साधला आहे. सुरेख पुणेकर म्हणाल्या कि, ‘जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करत नाचणे त्याला लावणी म्हणत नाहीत. लावणी कलेला योग्य प्रकारे सादर गेले केले पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवरुन ओढून मारतील. आताच्या लावणी सम्राज्ञींनी अश्लील डान्स सोडून भान ठेवून वागण्याची गरज आहे. हे असेच जर सुरु राहिले तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.’
Discussion about this post