हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी मुंबई मध्ये आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत असून सुशांतचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या आहे याचा तपास सुरू आहे. पण अद्यापही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत सीबीआय (CBI) पोहोचलेलं नाही. त्याचं कुटुंब अजूनही सुशांत गेल्याच्या दु:खातून सावरु शकलेलं नाही, असंच दिसत आहे. सुशांतचे चाहतेही सुशांतच्या न्यायाची मागणी करत आहेत.
सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त त्याचं कुटुंबच नाही तर संपूर्ण जगातले त्याचे फॅन्स एकत्र येत आहेत. परदेशातही यावेळी ‘सुशांत जस्टीस नाऊ’ (Sushant Justice Now) लिहलेले हॅशटॅग, बॅनर्स प्रसिद्ध होत आहेत. श्रीलंकेमध्येही अशाप्रकारची बॅनर्स झळकलेली दिसून आली. यावर सुशांतची बहीण श्वेताने ट्विट करत ‘थँक यू श्रीलंका’ असं म्हटलं आहे.
श्रीलंकेच्या रस्त्यांवर ‘सुशांत जस्टिस नाऊ’ असं लिहलेली बॅनर्स झळकली आहेत. श्रीलंकेतले चाहतेदेखील सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत आहेत. तसंच गेल्या 2 दिवसांपासून #CBIStartArrestInSSRCase हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ट्विटरवरचे अनेक युझर्स सुशांतला न्याय देण्याची मागणी करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’