हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. या नंतर राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
जनता दलाचे (संयुक्त) नेते संजय सिंह यांनी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिस सक्षम होते, मात्र महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काम करू दिले नाही, असेही संजय सिंह म्हणाले. आता सीबीआय चौकशी झाल्यानंत या प्रकरणात दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य पुढे येईल असेही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी सिंह यांनी नीतीश कुमार यांच्याकडे केली. यानंतरच बिहार सरकारने या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचा निर्णय घेतला.