हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. या सहा जणांपैकी श्रुती मोदी या नावाची फार चर्चा आहे. ही श्रुती मोदी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रियासोबतच श्रुतीचंही नाव घेतलं होतं. त्यांच्या तक्रारीच्या आधारेच बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. बाकीची नावं जरी याआधी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी समोर आली असली तरी श्रुती मोदी हे नवीन नाव या प्रकरणात आता समोर आलं आहे.
रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून श्रुती मोदीने काम केलं आहे. सुशांतच्या कंपनीत रिया-शोविकचं सर्व काम श्रुती पाहायची. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी श्रुतीचीही चौकशी केली होती.
श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात सुशांतसोबत काम केलं होतं. ‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आणि दर महिन्याला जवळपास दहा लाख रुपये खर्च करायचा अशी माहिती श्रुतीने पोलिसांना दिली होती. यामध्ये वांद्रे इथल्या घराचं साडेचार लाख रुपये भाडं तो भरायचा. सुशांतच्या दर महिन्याच्या खर्चाचा हिशोबसुद्धा तिने पोलिसांना सोपवल्याचं कळतंय