मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याला आता महिनाभर झाला आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियावर सुशांतबद्दल वारंवार पोस्ट्स येत असतात. सुशांत यापुढे आपल्यात नाही यावर विश्वास ठेवण्यास कोणी तयार नाही. त्याने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या का केली असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. बातमीनुसार सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्यात होता.
त्याचबरोबर मुंबई पोलिस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सातत्याने तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात त्याच्या घरी उपस्थित आचारी नीरजची पुन्हा मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. सुमारे 6 तास चाललेल्या या चौकशीत मुंबई पोलिसांनी आत्महत्येच्या 3 दिवस आधी म्हणजे 11 जून ते 14 जून दरम्यान झालेल्या सर्व खाजगी तपशील, संभाषणे आणि खाण्यापिण्यातील सर्व गोष्टींची सविस्तर माहिती विचारली.
सुशांतसिंगची बहीण मितू आज पुन्हा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात येऊ शकते. पोलिसांना त्यांच्याशी 14 जूनच्या 3 महिन्यापूर्वी चे बोलणे, रिया चक्रवर्ती बरोबर चे संबंध, भांडणे आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काही नवीन चौकशी करायची आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे, परंतु पोलिस अद्यापपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत.