Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ताली’ बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! तृतीयपंथीयांच्या भूमिकेत दिसणार सुष्मिता सेन; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Taali
0
SHARES
624
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट असो किंवा वेब सिरीज प्रत्येक कलाकृतीत आपलं १००% देऊन प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटविणारी अभिनेत्री सुष्मिता सेन अतिशय लोकप्रिय आहे. विविध भूमिकांना न्याय देणे हि बाब सुष्मिताच्या अंगवळणी पडल्यामुळे एखाद्या आव्हानात्मक भूमिकेत तिने दिसावं अशी नेहमीच प्रेक्षकांची अपेक्षा होती. तर हि प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण सुष्मिता सेन येत्या नव्या वेब सिरीजमध्ये तृतीयपंथीयांची अत्यंत आव्हानात्मक अशी भूमिका साकारणार आहे. मुख्य म्हणजे गौरी सावंत यांच्यावर आधारित हि वेबसिरीज असून त्यांची भूमिका सुष्मिता साकारत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

एकेकाळी ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी जगासमोर ताठ मानेने उभी राहिली. ती म्हणजे गौरी सावंत. आयुष्यभर लोकांकडून मिळालेली हीन वागणूकही माणसाला पेटवून उठवू शकते याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहिल्यावर येतो. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्यात काय संघर्ष असतो..? तो अनुभवल्याशिवाय समजणे कठीण आहे. आज गौरी सावंत हे नाव घराघरात माहित आहे. पण त्यांनी भोगलेलं दुःख, संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्या व्यवसाय याबाबत फार तोडकं मोडकं लोकांना ठाऊक आहे. म्हणून त्यांचा जीवनसंघर्ष घेऊन ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

‘ताली’ असे या वेबसिरीजचे नाव आहे आणि याचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक रवी जाधव करणार आहेत. आजवर तृतीयपंथीयांचा अभिनय अनेक पुरुष अभिनेत्यांनी केला आहे. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी तृतीयपंथी साकारला असला तरीही पहिल्यांदाच एक अभिनेत्री तृतीय पंथीयाची भूमिका साकारणार आहे हि बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर वेब सीरिजमधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ताली – बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी !’. आता या वेब सिरिजचा टीझर कधी येतोय आणि ती कधी प्रदर्शित होते..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Instagram PostRavi JadhavShree Gauri SawantSushmita SenTaaliviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group