Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हार्ट सर्जरीनंतर सुश्मिता सेन पहिल्यांदाच आली लाईव्ह; हेल्थ अपडेट देत म्हणाली..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sushmita Sen
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक येऊन गेल्याची माहिती तिने स्वतःच सोशल इंडियावर दिली होती. तिच्या या पोस्टने चाहत्यांना मोठा धक्का लागला होता आणि जो तो तिच्या प्रकृतीची काळजी करू लागला होता. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला. अभिनेत्रीला हार्ट अटॅक आल्यानंतर तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. यानंतर आता तिची तब्येत कशी आहे याबाबत तिचे चाहते चिंतेत असताना सुश्मिता स्वतःच इंस्टावर लाईव्ह आली होती. यावेळी तिने स्वतः आपली हेल्थ अपडेट शेअर करत लवकरच कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

या लाईव्ह व्हिडिओमध्ये सुश्मिता सेन म्हणाली कि, ‘माझ्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे आवाज असा येत आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. गेल्या दोन दिवसात तुम्ही माझ्याप्रती व्यक्त केलेली काळजी व प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता. मी आता बरी आहे. हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अनेकांना या परिस्थितीतून जावं लागतं. कोणाबरोबर काही ना काही वाईट घडत असतं. पण मला मिळालेले प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे आज मी बरी होत आहे. यासाठी मी तुमची आभारी आहे’.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

इतकेच नव्हे तर सुश्मिताने या लाइव्ह व्हिडीओमधून तिचे कुटुंबीय, निकटवर्तीय आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. सोबतच तिने आपल्या चाहत्यांना फिट आणि फाईन राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली कि, ‘मी व्यायाम करत असूनही, फिटनेसकडे इतकं लक्ष देत असूनही मला हृदयविकाराचा झटका आला. हा विचार करुन तुमच्यापैकी काही जण व्यायाम करणं बंद करतील. पण व्यायाम केल्यामुळेच मी यातून बरी होऊ शकले. त्यामुळे नियमित व्यायाम करा’. सुश्मिताच्या या लाईव्ह व्हिडिओनंतर तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तरीही अजून अभिनेत्री पूर्ण बरी झालेली नाही त्यामुळे तिने स्वतःची काळजी घ्यावी असे चाहते सांगत आहेत.

Tags: Bollywood ActressHealth UpdateInsta LiveSushmita SenViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group