Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बाथरूममध्ये आढळला नामांकित फॅशन डिझायनरचा मृतदेह; आत्महत्या का घातपात..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Pratyusha Garimella
0
SHARES
18
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अत्यंत प्रसिद्ध अशा नामांकित फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला यांचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला आहे. शनिवारी ११ जून २०२२ रोजी हैदराबादमधील तेलंगणा येथे बंजारा हिल्स परिसरातील प्रत्युषा गारिमेच्या राहत्या घरात बाथरूममध्ये तिचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Fashion designer Prathyusha Garimella was found dead in her Banjara Hills residence in Hyderabad. Police suspect suicide.#PratyushaGarimella pic.twitter.com/5YGkMuIeuY

— HT City (@htcity) June 12, 2022

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला ही बंजारा हिल्स येथे राहत होती. अचानक तिचा काहीही संपर्क होत नाही असे तिच्या सुरक्षा रक्षकांच्या ध्यानात आले आणि त्यांनी शनिवारी दुपारी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हा घरातील बाथरूममध्ये प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला. तपासानुसार, तिच्या खोलीत कार्बन मोनॉक्साईडची बाटली सापडली आहे. त्यामुळे तूर्तास प्रत्युषाने कार्बन मोनॉक्साईडचा वापर करून आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच मुख्य कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by bollywood reporter (@bollywood_ka_khabrii)

मिळालेल्या माहितीनुसार, नामांकित फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला हि गेल्या काही काळापासून डिप्रेशनची शिकार झाली होती. यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते असे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती पुरवण्यात आलेली नाही. तूर्तास पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या तिचा मृतदेह पोस्ट मॉर्टम प्रक्रियेसाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य धागा म्हणजे, पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, प्रत्युषा आयुष्यात खूप एकटी होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्यासाठी ती कोणाला दोषी मानत नाही. मात्र, यावरून हे प्रकरण आत्महत्येचंच आहे असा निष्कर्ष लावणे योग्य नाही. म्हणून संशयास्पद मृत्यूची नोंद करीत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Tags: death newsFashion DesignerSouth CelebritySuspicious DeathTrending News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group