हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लाडका अभिनेता स्वप्नील जोशीची चॉकलेट हिरो म्हणून एक वेगळीच ओळख आहे. सध्या तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून छोटा पडदा गाजवताना दिसतो आहे. स्वप्नीलने आजवर अनेक भूमिका साकारल्या. त्यापैकी कित्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. यांपैकी सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे श्रीकृष्ण आणि कुश. याच भूमिकांसाठी नुकतेच स्वप्नीलला ‘आचार्य सूरदास पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. ज्यामध्ये या पुरस्कार सोहळ्यातील क्षण आपण पाहू शकता. सोबतच त्याने आभार व्यक्त करणारी भावना कॅप्शनच्या माध्यमातून लिहिली आहे.. यात त्याने लिहिलंय की, ‘वट्टे रात्र !! आदरणीय सद्गुरु श्रींच्या हस्ते आदरणीय हिंदुत्वाचे स्तंभ – ‘आचार्य सूरदास पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंद आणि नम्र. रितेश्वरजी महाराज आणि इतर दिग्गजांनी माझ्या कुश आणि श्री कृष्णाच्या भूमिकेतून हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मला हा सन्मान दिला. या सन्मानासाठी डॉ. वैदेही जी तमन आणि टीम “हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन” चे खूप खूप आभार!’
पुढे लिहिलंय कि, ‘श्री राजनाथ सिंह जी, श्री देवेंद्र फडणवीस जी, श्रीमती वसुंधरा राजे सिंधिया जी, श्री उदित नारायण जी, श्री अनुराधा पौडवाल जी यांसारख्या दिग्गजांच्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत असणे हे स्वप्नासारखे आहे! आई- बाबा, लीना, मायरा, राघ, मला मी अशी व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद! सागर परिवाराचे आभार (आज मला पापाजींची खूप आठवण येते!) मला नेहमी त्यांचे असल्यासारखे वाटते. आणि शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्यावर नेहमी प्रेम केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार! हे मला या मार्गावर अधिक परिश्रमपूर्वक, अधिक उत्कटतेने चालण्याचा आणि अधिक चांगल्यासाठी माझ्या नम्र मार्गाने कार्य करण्याचा आत्मविश्वास देते! जय श्री राम! जय कन्हैया लाल की!
Discussion about this post