हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील एका वेगळ्या आशयाची ‘तू तेव्हा तशी’ हि मालिका आता संपली आहे. मालिकेला निरोप देताना जेव्हढे प्रेक्षक भावुक होतात तेव्हढेच कलाकार देखील भावुक होत असतात. मालिकेतील पात्रासोबत जगणारे हे कलाकार एखाद पात्र तिथेच सोडून पुढे निधुन जात असताना खूप आठवणींचं गाठोडं घेऊन जात असतात. या मालिकेत स्वप्निल जोशीने सौरभ तर शिल्पा तुळसकरने मिस अनामिका या भूमिका साकारल्या होत्या. कॉलेजमधलं प्रेम वयाच्या चाळीशीत पुन्हा भेटल्यानंतर नव्याने प्रेमात पडणाऱ्या या दोघांची हि गोष्ट प्रेक्षकांना भावली. दरम्यान शूटिंगचा शेवटचा सीन शूट करताना मालिकेची संपूर्ण टीम आनंदाश्रू ढाळत होती आणि या प्रसंगाचा एक व्हिडिओ स्वप्नीलने शेयर केला आहे. सोबत आपल्या भावना व्यक्त करत तोदेखील भावुक झाला आहे.
या पोस्टमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीने लिहिलंय की, ‘शेवट कधीच सोपा नसतो! आज रात्री T3 (तु तेव्हा तशी) संपत आहे. या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते. इथे तयार झालेले बंध आणि हे आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं ‘झी’चं कुटुंब. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. आम्ही आमच्या कामाला घरचच कार्य समजतो! आणि आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता मालिका संपणार असल्याने आम्ही रोज भेटणार नसलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू!’
स्वप्नीलच्या या पोस्टवर त्याचे चाहते, मालिकेचे प्रेक्षक आणि नेटकरी यांनीदेखील कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वप्नीलची प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली आहे. या पोस्टवर अनेकांनी ‘मिस यु पट्या’ आणि ‘आम्ही या मालिकेला खूप मिस करू’ अशा कमेंट केल्या आहेत. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत पट्या आणि मिस अनामिका यांची वयाच्या चाळीशीतील एक गोड लव्हस्टोरी सगळ्यांना पहायला मिळाली. या मालिकेने प्रेक्षकांचे अतोनात प्रेम मिळवले. इतकेच नव्हे तर काहीवेळा प्रेक्षकांची निराशा झाली, कलाकार ट्रोलसुद्धा झाले. या मालिकेत स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकरसह सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकारदेखील अन्य मुख्य भूमिकेत होते. या प्रत्येक कलाकाराने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनावर कायमची एक छाप सोडून गेलं आहे इतकं मात्र खरं!
Discussion about this post