Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

LOVE STORIES मधून होणार स्वप्नील जोशीची ‘सुटका’..?; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
182
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्निल जोशी हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कृष्ण म्हणून तर ओळखला जातोच. शिवाय चॉकलेट बॉईजच्या लिटमध्ये पहिलं नाव स्वप्नीलचंच येत. आता वय थोडं जास्त असलं तरीही फॅन फॉलोईंगमध्ये त्याला काही तोड नाही.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या स्वप्नील झी मराठीच्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत चाळिशीतलं प्रेम दाखवतो आहे आणि यातही त्याने तरुणीचं मन काबीज केलंय. असा मनमोहक स्वप्नील जर लव्ह स्टोरीज मधून सुटकेची अपेक्षा ठेवत असेल तर…? सध्या स्वप्नीलची एक सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांना अशाच प्रश्न टाकताना दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि यामुळे तो नेहमीच विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. यावेळी त्याने अशी एक पोस्ट शेअर केली आहे जी पाहून सगळ्यांना नुसते प्रश्न पडले आहेत. त्याच काय आहे.., स्वप्नीलने या पोस्टमधून आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत संकेत दिला आहे. त्याने आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि,
Period films मधून होणार प्रसाद ओक ची “सुटका”
Lovey-dovey image मधून होणार प्रार्थना बेहेरे ची “सुटका”
आणि LOVE STORIES मधून होणार स्वप्नील जोशी ची “सुटका”
नवं काय ???
What next ???
अशा प्रश्नांमधून होणार आमच्या सगळ्यांची…*”सुटका”*..
याचाच अर्थ असा कि लवकरच प्रसाद ओक दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशीसह प्रार्थना बेहेरे अभिनित ‘सुटका’ असे शीर्षक असलेला चित्रपट येऊ घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

काहीसे वेगळे कथानक घेऊन येणारा हा चित्रपट कदाचित प्रेमवीर या पात्राहून काहीतरी वेगळे पात्र साकारण्याची संधी स्वप्निलसाठी घेऊन आला आहे. म्हणूनच स्वप्नीलने अशी पोस्ट शेअर केली असावी. या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, आगामी चित्रपट ‘सुटका’चे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. तसेच अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचे छायाचित्रण करण्याची जबाबदारी संजय मेमाणे यांच्या खांद्यावर आहे. तर चित्रपटाची निर्मिती सूत्र निर्माते परितोष पेंटर आणि राजेश मोहंती यांच्या हाती आहेत.

Tags: Instagram PostPrarthana BeherePrasad Oakswapnil joshiUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group