हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समांतर वेब सीरिजच्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती ती समांतर २ ची आणि समांतर २ आला सुद्धा आणि त्याने जिंकलं सुद्धा. कुमार आणि चक्रपाणी यांच्या ‘समांतर’ आयुष्याची गुंतागुंत, वाढणारा तिढा आणि न सुटणारी उत्सुकता म्हणजेच समांतर २. या सीरिजने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्या सीझनपेक्षा या दुसऱ्या सिजनने नुसता कल्ला केला आहे. आता या मराठी सीरिजने एक नवा कोरा विक्रम केला आहे. सर्वाधिक पहिली गेलेली हि पहिलीच वेबसिरीज ठरली आहे.
‘समांतर २’ ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरची सर्वाधिक पाहिली गेलेली पहिली मराठी वेब सीरिज ठरली आहे. अगदी काही दिवसात ५ कोटीपेक्षा अधिक प्रेक्षकांनी ही सीरिज पाहिली आहे. कुमार अर्थात स्वप्नील जोशीला याचा अतिशय आनंद झाला आहे. कदाचित यामुळे थोडा का होईना भारावूनच गेला आहे. त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवाय मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. ‘समांतर २’ ने ५.६ कोटी व्ह्युजचा टप्पा ओलांडला. सर्व टीमचे अभिनंदन आणि प्रेक्षकांचे आभार, असे त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर बातमी शेअर करताना लिहिले आहे.
‘समांतर’च्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन सतीश राजवाडेंनी केले होते. यानंतर दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केले आहे. या सीरिजची कथा नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या भागामध्ये स्वप्नीलने अर्थात कुमार महाजनने नितेश भारद्वाज अर्थात सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी सुदर्शनने त्याचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ लिखित असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडत होत्या आणि एका रंजक वळणावर येऊन ही कथा संपली. त्यामुळे ‘समांतर २’बाबतची उत्सुकता मोठी होता. पुढे समांतर २ आल्यानंतर प्रेक्षकांची आपल्या उत्सुकतेचा पिच्छा पुरवला आणि आज समांतर २ चे यश वाखडण्याजोगे आहे.
Discussion about this post