हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील क्युटेस्ट अभिनेता सुपरस्टार स्वप्नील जोशी या नव्या वर्षात चाहत्यांसाठी एक नवाकोरा सिनेमा घेऊन येतोय. अलीकडेच त्याने आपल्या आगामी ‘अश्वत्थ’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला असून तो याच वर्षात हिवाळ्यात प्रदर्शित होईल असे त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज केले होते. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे कि, ‘अश्वत्थ’ आहे तरी काय..? कारण ‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बनविलेला आहे. संकृतनुसार या श्लोकाचा अर्थ होतो कि, ‘जेव्हा मनुष्य योगारूढ होतो, तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो…’
नांदी..
नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची
नांदी…
अश्वत्थची !!!@GupteLokesh दिग्दर्शित ! #Sameerpmhatre#ShailendraBarve#Thakurrupak#MakarandDeshpande#Kedar_soman #SachinGurav#newfilm #new #film #Announcement #WINTER #2022NewYear pic.twitter.com/o3pRnNBxrz— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) December 31, 2021
‘अश्वत्थ’ चित्रपटाच्या टीझरमध्ये उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या भगवत गीतेच्या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” हा आवाज अत्यंत भारदस्त आणि मनाला हात घालणारा आहे. हा आवाज अभिनेता मकरंद देशपांडे यांचा आहे. त्यामुळे एकंदरच या चित्रपटाचा टीझर फार वेगळा आहे. तर श्लोक, उधळलेला घोडा आणि देशपांडेंच्या आवाज.. सर्च कसं कोड्यात टाकणारं आहे. त्यामुळे या टीझरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या टीझरचा व्हीडीओ स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिले होते कि,“नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी…नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची! नांदी…अश्वत्थची !!!”
अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘अश्वत्थ’च्या पोस्टरची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे. एकापेक्षा एक हटके हीट चित्रपटांनंतर स्वप्निलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका स्वप्नीलची असली तरीही अद्याप इतर कलाकार आणि तंत्रज्ञ याबद्दलची माहिती गुलदस्त्यात आहे. मात्र ‘अश्वत्थ’च्या टीझरच्या निमित्ताने सिनेसृष्टीत काहीतरी नवं आणि रंजक येणार आहे याबद्दल काहीच शंका नाही असे नेटकरी सांगताना दिसत आहेत.
Discussion about this post