Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि ओठांवर एव्हढी सूज ..?; श्रुती हासनचा फोटो पाहून चाहते चिंतेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shruti Haasan
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. पण सध्या तिचा एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामधील तिची अवस्था पाहून कुणालाही प्रश्न पडेल कि श्रुतीला काय झालंय..? या फोटोत तिचे डोळे आणि ओठ सुजलेले दिसत आहेत. तर केस पूर्णपणे विस्कटलेले दिसत आहेत. हा फोटो पाहून कुणालाही तिची काळजी वाटणं फारच स्वाभाविक आहे. मुख्य म्हणजे हा फोटो तिने स्वतःच शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

सोशल मीडियावर आपले नवनवीन लूक शेअर करणे हि सेलिब्रिटींसाठी रोजची गोष्ट आहे. पण श्रुती हासनने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून तिची हि अवस्था कशी झाली..? तिच्या सोबत काही बरं वाईट झालं तर नाही ना..? तीला कोणता आजार झालाय का..? असे अनेक प्रश्न चटकन चाहत्यांच्या मनात आले असतील. श्रुतीचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने वायरल होत आहे. हा फोटो श्रुतीचा सेल्फी फोटो आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘परफेक्ट सेल्फी आणि पोस्टच्या जगात हे तेच आहेत जे शेवटापर्यंत पोहोचू शकलेला नाही… केसांचा खराब दिवस… ताप आणि साइनस डे… पीरियड क्रॅम्प्सचा दिवस अजून बाकी आहे. आशा करते की तुम्ही देखील यांचा आनंद घ्याल’.

View this post on Instagram

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये श्रुतीने #stayweird असा हॅशटॅग वापरला आहे. सगळ्यात आधी तिचा हा फोटो पाहून तिच्यासोबत नक्की काय झालंय..? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. पण त्या फोटोसोबत लिहिलेलं कॅप्शन वाचून मात्र अनेकांचा जीव भांड्यात पडला असेल. तिचे हे फोटो विचित्र असले तरी त्या फोटोमागील तिच्या भावना सच्च्या आहेत. हे पाहून अनेक चाहते तिच्या पोस्टची प्रशंसा करत आहेत. जगातील प्रत्येक स्त्री अशा समस्यांसोबत झगडत असते पण व्यक्त होत नाही. मात्र श्रुतीने त्या भावना अगदी खुलेपणाने व्यक्त केल्याबद्दल तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostShruti HaasanViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group