हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारत होते. या भूमिकेला लोकांनी प्रचंड प्रेम दिले आणि देत होते. मात्र तरीही चॅनेलने तडकाफडकी किरण मानेंना मालिकेतून काढून टाकले आणि नव्या वादाला तोंड फुटले. यानंतर आपल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप मानेंनी केला होता. त्यावर मालिकेतील काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांचे आमच्यासोबत वर्तन चांगले नव्हते. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.
मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं
महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत
कोण आहेत मानेचे बोलवते धनी ??
या सोंगाड्यावर कारवाई करा
शिक्षा झालीचं पाहीजे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 17, 2022
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून किरण माने यांच्या विरोधात ट्विट लिहिले आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिले कि, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत. कोण आहेत मानेचे बोलवते धनी ?? या सोंगाड्यावर कारवाई करा. शिक्षा झालीचं पाहीजे.
दरम्यान नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीनेदेखील या प्रकरणी परिपत्रक जाहीर केले आहे. यात लिहिले आहे कि, किरण मानेंना ते घेत असलेल्या राजकीय भूमिकेवरून काढलेले नाही. किरण माने यांनी चॅनेलवर लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. किरण माने यांना महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सहकलाकार, दिग्दर्शक आणि मालिकेतील युनिटमधील सदस्यांनी अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरूद्ध अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. याआधी त्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकले आहे.
Discussion about this post