Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आजा प्यार करे… बेशुमार करे!! ‘लस्ट स्टोरी 2’मध्ये विजय- तमन्नाचा रोमांस लावणार आग; पहा टिझर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lust Story 2
0
SHARES
63
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओटीटी प्लॅटफॉर्म हा गेल्या काही काळापासून अत्यंत आवडता एंटरटेनमेंटचा प्लॅटफॉर्म झाला आहे. त्यामळे प्रेक्षक थिएटर इतकीच पसंती ओटीटी प्लॅटफॉर्मला देताना दिसत आहेत. परिणामी अनेक सिनेमे, शो हे ओटीटीवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘लस्ट स्टोरीज’ ही अत्यंत चर्चेत राहिलेली बोल्ड वेबसिरिज होती. याच वेबसिरीजचा पुढील भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याचा टिझर रिलीज झाला असून यामधील स्टारकास्ट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

‘लस्ट स्टोरी’च्या पहिल्या सिजनमध्ये ४ वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. अतिशय वेगळा कन्टेन्ट आणि दमदार कलाकारांमुळे ही वेब सिरीज तुफान गाजली. यानंतर आता पुन्हा एकदा ‘लस्ट स्टोरीज’ एका वेगळ्या ढंगात कमबॅक करत आहे. याहीवेळी अतिशय वेगळा कन्टेन्ट, नवनवीन स्टोरी आणि नवनवीन कलाकारांसह ‘लस्ट स्टोरीज २’चा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. या सिरीजमध्ये ४ प्रसिद्ध दिग्दर्शक त्यांच्या ४ नवीन कथा घेऊन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Buzz (@bollytellybuzz)

या सीरिजमध्ये काजोल, नीना गुप्ता, अमृता सुभाष, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि अंगद बेदी यांच्यासह अनेक मातब्बर कलाकार मंडळी दिसणार आहेत. RSVP आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ही वेब सिरीज लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर येत्या २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर ‘लास्ट स्टोरी २’चा टिझर तुफान व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे या सिरीजमध्ये कथित कपल विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया फुल्ल रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यांमुळे त्यांचे चाहते या सिरीजबाबत जास्त उत्सुक आहेत. अनेक ठिकाणी तमन्ना आणि विजय एकत्र स्पॉट झाल्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलले जात आहे. मात्र अजूनही त्यांनी आपल्या नात्याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.

Tags: Instagram PostNetflixOTT PlatformUpcoming Web SeriesYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group