हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिथे माणुसकी आहे काय? असा प्रश्न पडतो तिथे भीषण काळात स्वार्थ न पाहता अक्षरशः झोकून काम करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी डोळ्यांसमोर येतात. आताच कोरोनाचा काळदेखील असाच वास्तवदर्शी आहे. कारण अश्याच संकटांच्या काळात रील नव्हे तर रिअल हिरोजची किंमत कळते. असाच एक काळ मुंबईवर लोटून गेला होता. ज्याची आठवण आजही थरकाप भरवते. २६/११… एक अशी परिस्थिती जेव्हा शिक्षण आणि पैसे दोन्ही कवडीमोल ठरले. अख्खी मुंबई होरपळत आणि मुंबईकर मनातून खचू लागला होता. तेव्हा खऱ्या खुऱ्या आयुष्यातील हिरोंनी जगण्याची एक नवी उमेद जागृत केली. या वास्तवावर निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि एमी एंटरटेंमेंटच्या मोनिशा अडवानी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केलेली ‘मुंबई डायरीज २६/११’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हि वेब सिरीज मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शूरतेची व धाडसाची कथा सांगते. निखिल अडवानी आणि निखिल गोंसाल्वीस यांनी दिग्दर्शन केलेली ही सिरीज या आतंकवादी हल्ल्यादरम्यान निस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या प्रत्येक डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी यांची आतापर्यंत प्रकाशात न आलेली कहाणी दर्शवित आहे. कोंकना सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी अशी तंगडी स्टार कास्ट यात आपल्याला पाहायला मिळेल. हि वेबसिरीज ९ सप्टेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर २४० हुन अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘मुंबई डायरीज २६/११’ चे कथानक काल्पनिक असले तरीही असत्य नाही. कारण हि कथा २६/११ रोजी झालेल्या त्या आतंकवादी हल्ल्यातील मुंबईकरांमधली एकजूट दाखवणारी ती रात्र उभी करते, ज्या रात्री एकही मुंबईकर सुखाची झोप घेऊ शकला नाही. या सिरीजमध्ये शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर तसेच संपूर्ण मुंबई शहरात कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांसमोर उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यावर कर्मचाऱ्यांनी केलेली मात याविषयी भाष्य केले आहे. हि कथा तो प्रसंग आहे जो आजतागायत कोणताही मुंबईकर विसरलेला नाही. आजही २६/११ च्या दिवशी शाहिद झालेल्या त्या प्रत्येक हिरोला सलामी ठोकण्यासाठी मुंबईकर कधीच विचार करत नाही. कारण आजची मुंबई त्या शहिद जवानांची देणगी आहे.
Discussion about this post