हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवरायांचा इतिहास आजच्या पिढीसमोर दर्शविण्यासाठी आजकाल अनेक निर्माते आणि दिग्दर्शक रुपेरी पडद्यावर चित्रपट निर्मिती करताना दिसत आहेत. अलीकडेच गेल्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर पावनखिंड प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कसा आणि का केला हा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,’ असं तडफदार कॅप्शन देत शेअर केला आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण अध्याय आहे.
हा टिझर साधारण ४५ सेकंदांचा आहे. या टिझर व्हिडिओची सुरुवात अफजलखानापासून होते. मात्र या व्हिडिओत हि भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा चेहरा लपविला आहे. दरम्यान हि भूमिका कोणी साकारली आहे हे स्पष्ट समजून येत नसले तरीही शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा दिसतोय. या टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
Discussion about this post