Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया भट्ट निर्मित ‘डार्लिंग्ज’चा टीझर रिलीज; नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 5, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Darlings
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कधी आगामी चित्रपट तर कधी तीच लग्न आणि आतातर तिची प्रेग्नेंसी. पण याहीपेक्षा वेगळं कारण आहे ज्यामुळे सध्या आलिया चर्चेत आहे. ते कारण म्हणजे आलियाचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण. होय. आलियाने पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम पाहिलेला डार्लिंग्ज’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असून याचा टिझर रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग्ज’ हा नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया निर्माती म्हणूनही पहिल्यांदा सर्वांसमोर येतेय हि याची खासियत. या चित्रपटात शेफाली शहा, विजय वर्मा, रोशनी मॅथ्यू या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये आलिया आणि विजय वर्माचा रोमान्स तसेच दोघांनी लगेच आईचा आशीर्वाद घेऊन केलेलं लग्न हे सगळं एकदम फास्टमध्ये दाखवलंय. शिवाय आलिया एका बेडकाची आणि विंचवाची स्टोरी बॅकग्राऊंडला सांगताना दिसतेय. पण ते कशासाठी..? काय आहे या स्टोरीमध्ये हे जाणून घ्यायचे असेल तर हा सिनेमा पाहायलाच हवा.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

या टीझरचा व्हिडीओ अभिनेत्री आलिया भट्टने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियाने सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हा फक्त टीझर आहे डार्लिंग्ज, ५ ऑगस्टला येतेय मी’. ‘डार्लिंग्ज’चा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झालाय आणि सोबतच व्हायरल देखील झालाय. आलियाच्या चाहत्यांनी तिच्या आगामी चित्रपटाचा टिझर उचलून धरलाय. आलियाने एका मुलाखतीत ‘डार्लिंग्ज’ विषयी सांगितले होते. तेव्हा ती म्हणाली होती कि, ‘हा सिनेमा तिच्या खूप जवळचा आहे. निर्माती म्हणून तिची नवी इनिंग सुरु होते आहे असं देखील ती म्हणाली होती’.

Tags: Aalia BhattDarlingsInstagram PostOfficial TeaserViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group