Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तेजस्विनी पंडितच्या ‘अथांग’ वेबसिरीजचा थरारक टिझर प्रदर्शित; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Athang
0
SHARES
141
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा उत्तम प्लॅटफॉर्म मानला जातो. यामुळे विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वारंवार नवनवीन वेब शो, चित्रपट आणि सिरीज येत असतात. सध्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरीज. ज्याचे नाव आहे ‘अथांग’. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने केली आहे. त्यामुळे हि वेबसिरीज अत्यंत खास आहे. शिवाय अथांगचे दिग्दर्शन जयंत पवार यांनी केले आहे. या सिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून चांगलाच चर्चेत आला आहे. हि वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित ‘अथांग’मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘अथांग’चा रंजक व उत्कंठावर्धक टीझर पाहून वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. वेबसिरीजचा टीझर पाहताना ‘अथांग’ वेब सिरीज हॉरर की थ्रिलर..? असा प्रश्न पडतो. एका शापित कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक तरल प्रेमकथाही पाहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर या कलाकृतीविषयी बोलताना म्हणाले कि, ‘आतापर्यंत प्लॅनेट मराठीनं अशा प्रकारच्या आशयाची निर्मिती केलेली नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि मागणीनुसार आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती करतो. ‘अथांग’ ही त्यापैकीच एक आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तेजस्विनी पंडित उत्तम अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण आहे. प्लॅनेट मराठीच्या गाजलेल्या ‘अनुराधा’ आणि ‘रानबाजार’ या वेबसीरीजमध्ये तिनं जबरदस्त परफॉर्मंस दिलाय. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक ताकदीची निर्मितीसुद्धा आहे. तिला आशयाची जाण असल्याने ही वेबसिरीज सर्वांचे लक्ष वेधून घेईल.’

Tags: Akshay BardapurkarInstagram PostPlanet Marathitejaswini panditViral VideoWeb Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group