Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जय शंभो नारायण! डॅडी Is Back; ‘दगडी चाळ 2’च्या टिझरने वाढवली प्रेक्षकांची धडधड; पहा व्हिडिओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawal 2
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नुसत्या नावात ज्यांच्या दहशत आहे… डोक्यावर गांधी टोपी आणि पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा ज्यांचा पेहराव… झुपकेदार मिशा आणि अस्तित्वात आगीच्या ज्वाला आणि काटक शरीरयष्टी असं हे व्यक्तिमत्त्व आहे. मुंबईच्या इतिहासात गँगवॉरचा इतिहास लिहिणारे अत्यंत महत्वपूर्ण नाव… असला जरी डाॅन तरी गरिबांना कैवारी वाटणारा… लोकांचा लोकनाथ म्हणून वावरणारा.. न्यायाच्या चौकटी तोडून जिथल्या तिथे न्याय करणारा… भायखळा सातरस्ता पासून अंडरवर्ल्ड ला थरकाप भरविणारे नाव…. म्हणजे डॅडी… अरुण गुलाब गवळी. चाळीच्या लोकांवर अन्याय नाही त्यांना न्याय मिळवून देणारे दगडी चाळीचे दबंग उर्फ ‘डॅडी’. यांच्या जीवनावर आधारित ‘दगडी चाळ’ चित्रपटाने तुफान कमाई केली. यानंतर आता दगडी चाळ २ लवकरच येत आहे. त्याचा टिझर रिलीज झाला असून चांगलाच चर्चेत आहे.

दगडी चाळ नंतर लवकरच या चित्रपटाचा पुढील भाग येणार असे जाहीर करण्यात आले होते. यानंतर नुकताच सोशल मीडियावर दगडी चाळ २ चा टिझर आणि त्याचसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाच्या टिझर ची भारी चर्चा आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित तर चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती मिळत आहे. या टीझरमध्ये तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच डॅडी… या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता मकरंद देशपांडे पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील त्यांची एन्ट्री इतकी भारी आहे तर चित्रपट काय दर्जा असेल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे.

या चित्रपटाच्या घोषणेबद्दल बोलताना निर्मात्या संगीता अहिर म्हणाल्या की, ”आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.’

Tags: Dagadi Chawl 2Makrand DeshpandeMarathi MovieOfficial TeaserViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group