Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणबीर- आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र भाग एक- शिवा’चा टिझर रिलीज; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Brahmastra
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर चालू आहे. अलीकडेच या चित्रपटातील रोमँटिक गाणे केसरीया’ची झलक रिलीज झाली होती. ज्यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे नवंनवं लग्न झालेलं जोडपं पहिल्यांदाच एकत्र दिसून आलं आहे. या गाण्याची झलक त्यांच्या लग्नादरम्यान निर्मात्यांनी रिलीज केली होती. यानंतर आता ‘ब्रम्हास्त्र’मध्ये बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि साऊथ स्टार नागार्जुन देखील दिसणार आहेत. हे ऐकून चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. तर या उत्सुकतेचे आणखी एक कारण म्हणजे या चित्रपटाचा टिझर.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

नुकताच सोशल मीडियावर ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी असा टिझर रिलीज झाला आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलीय भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय सगळेच वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. चित्रपटातील आलीय आणि रणबीरची केमिस्ट्री कमाल असेल यात काहीच शंका नाही. त्याशिवाय का केसरीयां गाण्याची नुसती झलक एव्हढी लोकप्रिय झाली आहे. तसेच चित्रपटाच्या टीझरमध्ये मौनी रॉय देखील एका वेगळ्यात भूमिकेत असेल असे दिसून येत आहे. शिवाय शेवटी अब खेल शुरू… हे वाक्य अमिताभ यांच्या आवाजात ऐकू येते. एकंदरच टीझरमधून एक हलकी झलक दिली आहे पण मूळ गाभा काय..? हे अजूनही लक्षात येत नाही. यासाठी १५ जूनची वाट पाहावी लागणार आहे. कारण येत्या १५ तारखेला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली येत्या ९ सप्टेंबर २०२२ रोजी आलिया रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज होणार आहे. तोपर्यंत चित्रपटाची झलक हि टिझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येईल. तूर्तास टिझर इतका लक्षवेधी आहे तर ट्रेलर काय असेल…? अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या टीझरमध्ये सुरु युद्ध कोणात आणि का चालू आहे..? शिवाय रणबीर रक्तात माखलेला, आलीया घाबरलेली आणि मौनी संतापलेली या टीझरमध्ये दिसतेय. टीझरची हि आक्रमकता त्याला वेगळे रूप देत आहे. रणबीर कपूर, एस एस राजामौली आणि अयान मुखर्जी यांचा ‘ब्रह्मास्त्र: भाग एक शिवा’ हा काहीतरी हटके आणि वेगळं घेऊन येतोय हेच चित्रपटाचा टिझर सांगतोय.

Tags: Alia BhatBollywood Upcoming MovieBrahmastra Part One ShivaOfficial Teaserranbir kapoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group