Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तेजस्वी प्रकाशची मराठी सिनेसृष्टीत एंट्री; अभिनय बेर्डेसोबत ‘या’ चित्रपटात दिसणार 

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Man Kasturi Re
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील अत्यंत गाजलेल्या ‘बिग बॉस 15’ची विजेती आणि एकता कपूरच्या ‘नागिन ६’ या पर्वातील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सगळ्यांचीच लाडकी आहे. रिऍलिटी शो, हिंदी मालिका यानंतर आता प्रेक्षकांची लाडकी तेजा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मुळात ती स्वतः मराठी असल्यामुळे प्रेक्षकांची तिला मराठी चित्रपटात पाहण्याची इच्छा होती. हि इच्छा आता पूर्ण होणार आहे. इतकेच नव्हे तर ती लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून याचे नाव ‘मन कस्तुरी रे’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

तेजस्वी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करणार असल्यामुळे ती आणि तिचे चाहते फार उत्सुक आहेत. मन कस्तुरी रे’ हा चित्रपट तरुणाईवर आधारित कथानक घेऊन येतो आहे. हि एक प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच नवे कोरे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमधून बिंधास्त, बेधडक श्रुती म्हणजेच तेजस्वी प्रकाश दिसतेय. तर तिच्यासोबत तिला सांभाळून घेणारा सिद्धांत अर्थात अभिनय बेर्डेदेखील दिसतो आहे. या चित्रपटात एक फ्रेश आणि नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by teja (fc) 👑❤ #tejatroops (@palakxtejasswi)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘संस्कार – धरोहर अपनों की’, ‘स्वरागिनी- जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’, ‘बिग बॉस १५’ आणि ‘नागिन ६’ अशा विविध हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

तर अभिनेता अभिनय बेर्डेने, ‘ती सध्या काय करते’, ‘अशी ही आशिकी’ आणि ‘रम्पाट’ अशा विविध मराठी चित्रपटातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भूल पाडली आहे. यानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटात दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. तर व्यंकट आर. अटिली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी निर्मिती केली आहे. तसेच निशीता केणी आणि करण कोंडे हे सहनिर्माते आहेत. यासह  यूएफओ मूव्हीज सिनेमाचे वितरक पार्टनर आहेत.

Tags: Abhinay BerdeInstagram PostPoster ReleasedTejaswwi PrakashUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group