Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सरप्राईज…!! तेजस्विनी इज बॅक; BIGG BOSS मराठीच्या घरात लोणारीची रिएंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 30, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tejaswini Lonari
0
SHARES
3.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अगदी अंतिम टप्प्यात आहे. येत्या नव्या वर्षात या सिजनचा विजेता कोण होणार..? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. आतापर्यंत या घराने बरेच चांगले वाईट प्रसंग पाहिले. कुणाला जिंकताना तर कणाला हरताना पाहिले.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

या चौथ्या सिजनमध्ये स्पर्धक तेजस्विनी लोणारीने आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या सिजनची तीच विजेती होणार असे सगळीकडे बोलले जात असताना तिच्या हाताला झालेली दुखापत तिला खेळाबाहेर घेऊन गेली. ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. पण आता तेजस्विनी पुन्हा एकदा घरात दमदार एंट्री करणार आहे. तसा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

बिग बॉस मराठीच्या घरात चॅलेंजर म्हणून आलेले राखी सावंत आणि आरोह वेलणकर यांच्या वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर घर नुसतं दणाणलं. ते आले आणि तेजस्विनी आठवड्याभरातच बाहेर गेली. सध्या या घरात फक्त राखीचा आवाज आणि दंगा सुरु आहे. तर बाकी सदस्य आराम करण्याच्या मूडमध्ये आहेत. ज्यामुळे प्रेक्षकही कंटाळले आहेत. म्हणूनच का काय आता बिग बॉस मराठीत पुन्हा एक वाइल्ड कार्ड एंट्री होतेय अशी चर्चा आहे. मुख्य म्हणजे हि वाईल्ड कार्ड दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्विनी लोणारी आहे असे बोलले जात आहे. पण तेजस्विनी लोणारीची घरात रिएंट्री हि वाईल्ड कार्ड नसून क्षणिक आहे. असे तिने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

 

तेजस्विनीने बिग बॉस मराठीच्या घरात रिएंटर करतानाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘थोड्या क्षणांसाठी का होईना पण मी परत एकदा बिग बाॅस house मध्ये गेले आणि ते ही फक्त तुमच्या प्रेमाखातर. तुम्हा सर्वांसाठी नवीन वर्षाची ही एक खास भेटच समजा. आणि खरंच सांगते हा या अनुभव खूप वेगळा आणि अविस्मरणीय होता. तुमचं प्रेम असच असूद्या.’ घरातील स्पर्धकांच्या तिच्या एंट्रीमागील सत्य माहित आहे का नाही हे तर माहित नाही. पण हि परत आली का काय..? अशी भीती काहींच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसून आली आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoTejaswini Lonari
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group