हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन एकदम जोरदार सुरु आहे. हे सीजन बऱ्याच कारणांमुळे वारंवार चर्चेत राहील. अनेकदा या सिजनला हल्ल्यात घेतलं गेलं. पण या सिजनमधील एक स्पर्धक अशी होती जिच्यासाठी प्रेक्षक अगदी वेडे होते. ती म्हणजे तेजस्विनी लोणारी. पण हाताला झालेल्या दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला घरातून बाहेर पडावं लागलं आणि प्रेक्षक नाराज झाले. तेजस्विनीचं या ‘बिग बॉस’ची विजेती आहे असे प्रेक्षक सोशल मीडियावर म्हणताना दिसले. यानंतर आता चाहत्यांनी तिला विजेतीचा टॅग असलेली ट्रॉफी गिफ्ट केली आहे. ज्याचा फोटो शेअर करत तेजस्विनीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजस्विनी लोणारी घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर वारंवार तीला ‘बिग बॉस’च्या घरात परत घेण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे. मात्र तिच्या हाताची दुखापत प्रचंड गंभीर असल्यामुळे ती खेळात सहभागी होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी त्यांच्या या लाडक्या स्पर्धकाला थेट ‘बिग बॉस’चा विजेता घोषित करत तिच्या नावाची ट्रॉफी तिच्या घरी पाठवली आहे. चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी ४’ ची विनिंग ट्रॉफी तेजस्विनीच्या घरी पाठवली आहे. ज्यावर ‘बिग बॉस मराठी ४ पब्लिक विनर’ असं लिहीलेलं आहे.
आपल्या चाहत्यांकडून मिळणारं हे प्रेम पाहून तेजस्विनी लोणारी प्रचंड भारावून गेली आहे. तिने या ट्रॉफीचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये अतिशय भावूक आणि आनंदी अशा मिश्र भावनांसह एक पोस्ट लिहिली आहे. तिने यात लिहिलं आहे कि, ‘माझ्यासाठी हाच विजय आहे. तुमचं निस्वार्थ प्रेम मी मिळवलं आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रेम दिलं आहे. मला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा पब्लिक विनर बनवल्याबद्दल तुमचे आभार मानते’
Discussion about this post