Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हार्ट अटॅकचा आणखी एक बळी; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे वयाच्या 78’व्या वर्षी निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 26, 2022
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
529
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षभरात कित्येक कलाकारांनी जगाचा रंगमंच सोडला. यांपैकी काही कलाकारांचे निधन हे हार्ट अटॅकमुळे झाल्याचे समोर आले होते. अशीच आणखी एक दुःखद बातमी आता तेलुगू सिने इंडस्ट्रीमधून देखील आली आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे शनिवारी रात्री निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.अभिनेते चलपती राव यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चलपती याना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू दरम्यान ते त्यांच्या घरीच होते. या बातमीने संपूर्ण साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Very sorry to hear that both the legends, #KaikalaSatyanarayana garu and #ChalapathiRao garu are no more for us.

Strength to their families & loved ones!

— Jaggu Bhai (@IamJagguBhai) December 25, 2022

साऊथ सिनेइंडस्ट्रीसाठी ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे निधन हि अतिशय मोठा चटका देणारी बातमी आहे. चलपती यांच्या जाण्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब, मित्र- परिवार, चाहते यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. माहितीनुसार, चलपती राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्थिर होती. ते वारंवार आजारी होते. ज्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ते रुपेरी पडद्यापासूनदेखील दूर होते. वाढत्या वयासोबत येणाऱ्या आजारांनी चलपती याना अभिनय सृष्टीपासून दूर नेले. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Terrible Year for Telugu cinema.
Saddened at the loss of another Gem of an actor #ChalapathiRao Garu.
Deepest condolences to Ravi Babu Garu, family and dear ones.
May his soul rest in peace.
Om Shanti 🙏

— Sai Dharam Tej (@IamSaiDharamTej) December 25, 2022

अभिनेते चलपती राव यांचे निधन झाल्याची बातमी समोर आल्यापासून तेलुगू सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार तसेच त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेते चलपती राव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सकारात्मक तसेच नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. चलपती त्यांचा मुलगा रवी बाबू हा देखील अभिनेता, दिग्दर्शक तसेच निर्माता आहे. चलपती हे आपल्या मुलासाठी अर्थात रवीसाठी आधारस्तंभ होते. पण त्यांच्या अचानक जाण्याने रवीने मोठा धसका घेतला आहे.

Tags: death newssouth actorSouth IndustryTelguTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group