Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लहानपणापासून क्रिकेट जगलेल्या प्रत्येकाची भावनिक गोष्ट म्हणजे ‘तेंडल्या’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tendlya
0
SHARES
94
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २००३ सालचा क्रिकेट वर्ल्डकप हा माझ्या आयुष्यातील क्रिकेटचा पहिला एन्काऊंटर. जेमतेम दुसरी इयत्ता पूर्ण झालेली आणि घरी रोज मॅच चालू. पाकिस्तानची बॉलिंग सचिनने चांगलीच फोडलेली, आशिष नेहराने इंग्लंडविरुद्धची मॅच जिंकून दिलेली, श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये सचिनने सनथ जयसूर्याचा कॅच घेतल्यानंतर वडिलांनी शाब्बास रे वाघा म्हणत उत्स्फूर्त दाद दिलेली आणि या सगळ्यावर कहर म्हणजे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये भारताला चोप चोप चोपून हरवल्यानंतर शेजारचा गणू दादा धाय मोकलून रडला आणि न जेवताच झोपी गेला ही आठवण..!

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या ही आणखी एक पुडी कुणीतरी सोडलेली..! दुसरी झाल्यावर एवढं सगळं समजण्यासाठी वेगळी बुद्धी लागत नव्हतीच. घरी सतत चालू असलेला टीव्ही, आजूबाजूला खेळायला येणारी मोठी पोरं आणि बिस्कीट पुड्यावर रन गोळा करून मॅच बघायला जाण्यासाठीची स्कीम यामुळं तेव्हा लागलेली क्रिकेटची आवड अगदी आजपर्यंत टिकली..! हे मी माझ्याबद्दल सांगितलं. अशी कहाणी महाराष्ट्रातील, देशातील करोडो लोकांची आहे. आणि तुमचा जन्म १९७५ ते २००८ सालातला असेल तर या क्रिकेटप्रेमाचं कनेक्शन सचिन रमेश तेंडुलकर उर्फ मास्टर ब्लास्टर उर्फ तेंडल्याशी नक्कीच जोडलेलं आहे. एका गावातील अशाच क्रिकेट आणि तेंडुलकरप्रेमी जनतेची भन्नाट गोष्ट म्हणजे तेंडल्या चित्रपट.

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

भारत देशात क्रिकेट, राजकारण आणि चित्रपट याविषयी भरपूर बोललं जातं, चर्चा केली जाते. रोजच्या जगण्यात यापैकी एक गोष्ट असली की तेवढाच विरंगुळा मिळतो. तुम्ही ग्रामीण, शहरी, आदिवासी किंवा इतर कुठल्याही भागात असा, तुमच्यापर्यंत एकदा ही गोष्ट पोहोचली तर तुम्ही त्याचे दिवाने बनता. बरं राजकारण सगळ्यांना आवडेल असं नाही, चित्रपटासाठीही केबल वगैरे घेण्याची परिस्थिती २० वर्षांपूर्वी बऱ्याच लोकांची नव्हती. अशा वेळी दूरदर्शन दिसणारी मॅच पहायला अख्खी पब्लिक गोळा व्हायची हे चित्र आपल्यातील प्रत्येकानेच अनुभवलंय. २५ वर्षांपूर्वी सोलापूरमधल्या एका गावात याच क्रिकेटप्रेमात काय काय घडलं हे रोजच्या आयुष्यातील प्रसंगातून सांगण्याचं काम दिग्दर्शक सचिन जाधव यांनी खुमासदारपणे केलंय.

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

गावाकडची अस्सल रांगडी भाषा, रोजच्या जगण्यातला जिवंतपणा आणि क्रिकेटमधून कळत-नकळत शिकायला मिळणाऱ्या गोष्टींची भन्नाट भट्टी या चित्रपटात जमून आलीय. सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या दोन पिढीतील दोन पोरांची ही गोष्ट आहे. त्यातील एक शाळकरी पोर तेंडल्या (अमन कांबळे) तर दुसरा जीपचालक गज्या (फिरोज शेख). शाळा शिकताना क्रिकेट खेळण्याच्या ज्या ज्या करामती आपण अनुभवल्यात त्या सगळ्या चित्रपटात पुन्हा पहायला मिळतात. स्टिकरवाली नवीन बॅट खरेदी करणं, सारखं खेळायचं नाव काढलं म्हणून आईचा मार खाणं, पैशांवर मॅच खेळणं या गोष्टी चित्रपटात पाहणं हे सुखाचं आहे. गज्या साधारण पंचवीशीतला तरुण. घराची जबाबदारी सांभाळायची आणि पैसा कमवून आई-बापाला सुख द्यायचं या विचारात जगणारा गज्या ठार क्रिकेटवेडा असतो. मॅच असली की तहान-भूक आणि काम विसरून गज्या टीव्हीपुढं तासंतास बसलेला असतो.

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

सचिन तेंडुलकरला खेळताना बघणं यासाठी जो आटापिटा लोक करायचे त्यांचा प्रतिनिधी म्हणजे गज्या. आता क्रिकेट पाहताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, जिओ टीव्ही आहे, घरोघरी टीव्ही आहेत. पण २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ असा नव्हता. गावाकडे तर मोजक्याच घरांमध्ये टीव्ही असायचा. एखादा सिनेमा किंवा मॅच बघायला तिथेच सगळी झुंबड उडायची. ब्लॅक अँड व्हाईट टिव्हीच्या जमान्यात रंगीत टीव्हीवाला जास्तच भाव खाऊन जायचा. घरच्या गरजा ओळखून वडिलांनी टीव्ही घेतला नाही याची जाणीव गज्याला असते. सावकाराकडून कर्ज घेऊन घेतलेल्या जीपचे हप्ते भरण्याचं टेन्शनही असतंच. या सगळ्यातून आपल्याला सचिनची प्रत्येक मॅच बघायला भेटली पाहिजे या इच्छेसाठी गज्या रंगीत टीव्ही घेण्याची धडपड सुरू करतो. ही धडपड यशस्वी होते का? हे सगळं चालू असताना सचिन तेंडुलकर कशी मदत करतो? हे सगळं अनुभवण्यासाठी हा चित्रपट तुम्ही आवर्जून पहायला हवा.

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

डायलॉग आणि कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. बाल कलाकारांनी जो अभिनय केलाय तो निखळ मनोरंजन करणारा आहे. हे बालकलाकार बहुदा सचिनच्या निवृत्तीनंतर जन्माला आलेले असावेत मात्र तरीही १९९५ ते २०१० या वर्षांतला गावठीपणा त्यांनी ज्या खुबीने साकारला आहे त्याला तोड नाही. सिनेमागृहात आलेले शहरी नागरिकसुद्धा गावाकडच्या या मुलांचा अभिनय प्रचंड एन्जॉय करताना पाहता आलं. क्रिकेटला रोजच्या जगण्याशी जोडण्याचा मास्टरस्ट्रोक दिग्दर्शकाने खेळला आहे. आई आणि मुलगा, वडील आणि मुलगा, दोस्त मंडळी, कर्ज देणारा सावकार आणि त्याला घाबरून राहणारे लोक, लव्हशिप मागण्यासाठी इच्छुक मुलगा आणि त्याची प्रेयसी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा मुलगा हे सगळं वास्तव जगणं रुपेरी पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. मनोरंजक, खिळवून ठेवणारा आणि जुन्या आठवणीत रमवणारा दर्जेदार मराठी चित्रपट असंच तेंडल्याचं वर्णन करता येईल. सुनंदन लेले यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tendlya तेंडल्या (@tendlya_marathi_movie)

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत ही ओरड मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळतेय. पुण्या-मुंबईसारख्या शहरांत, जिथे सिनेरसिक आवर्जून चित्रपटांना हजेरी लावतात तिथे तेंडल्याच्या शोला अर्ध्याहून अधिक थिएटर भरलेलं आहे. गावाकडच्या थिएटरमध्ये किमान १५ दिवस हा चित्रपट लावणं गरजेचं आहे. नव्या पिढीला तेंडल्याची क्रेझ काय होती हे समजण्यासाठी तर नक्कीच..!

चित्रपट परीक्षण : योगेश जगताप

Tags: Film ReviewInstagram PostMarathi MovieViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group