हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. हे आपण जाणतो. पण सगळ्यांचं सेम नसतं हे काही उदाहरणांमधूनच समजत. असंच एक उदाहरण ‘ भाग्य दिले तू मला’ हि मालिका प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. सध्या कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतील मुख्य पात्र राज आणि कावेरी यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे.
आपलं प्रेम आपल्यापासून दुरावतंय हे पाहून कावेरीला होणाऱ्या वेदनांनी प्रेक्षकही व्याकुळ झाले होते. पण अखेर तिला तिचं प्रेम मिळालं.. पण पूर्ण नाही. अद्याप कावेरीच्या तात्यांनी या नात्याला मान्यता दिलेली नाही. त्यांची मंजुरी घेण्यासाठी आता राज थेट गुहागरला पोहोचला आहे आणि आता मालिका जास्त लक्ष वेधून घेतेय.
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत राज आणि वैदेहीचं लग्न होता होता राहील. कारण वैदेहीचा खरा चेहरा कावेरी समोर आला आणि तिने राजसोबतचं तीच लग्न थांबवलं. कावेरीचे राजवर प्रेम आहे हे वैदेहीला पहिल्यापासून माहिती असतानाही ती अनभिज्ञ असल्याचे दाखवत राहिली हे जाणून तिची मैत्रीण म्हणून कावेरी प्रचंड दुखावली गेली आहे. तिने सगळ्यांसमोर वैदेहीचे खरे रूप आणले आणि सगळ्यांसमोर आपले राजवर प्रेम असल्याची कबुली दिली. पण तात्यांनी मात्र या नात्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज आणि कावेरीच्या प्रेमाची परीक्षा सुरू झाली आहे.
वैदेहीसोबत लग्न मोडल्यानंतर तात्या कावेरीला घेऊन थेट गुहागरला निघून जातात. त्यामुळे राजसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो कि तात्यांना कसं मनवायचं..? म्हणून राज थेट गुहागर गाठता पण आता इथे राजसमोर खूप मोठं आव्हान उभं राहील आहे.
तात्यांनी त्याला चॅलेंज दिले आहे की, आईच्या नावाशिवाय आणि पैशाशिवाय या गावात राहून दाखव, कमवून दाखव. तरंच मी कावेरीचा हात तुझ्या हातात देईन. तात्यांचे हे चॅलेंज राजने स्वीकारले आहे आणि त्यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.
आता राज कावेरीवरील प्रेमासाठी गुहागरमध्ये राहणार आणि विटभट्टीवर राबतानासुद्धा दिसणार आहे. तसेच शेतकाम, टेम्पो ड्रायव्हरचे कामदेखील करणार आहे. इतकेच काय तर तात्यांच्या टपरीवर धुणे भांडीचे काम देखील करणार आहे.एकंदरच या चॅलेंजमध्ये राज स्वतःला कसं सिध्द करेल.? हे आव्हान तो पूर्ण करेल का..? हे पाहण्यात खरी मजा आहे.
Discussion about this post