हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता राज्यात विविध कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरतेशेवटी राज्य सरकारने १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यात बहुतांश कोरोनाविषयक निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आता राज्यातील दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बाजारपेठ व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. अश्या पद्धतीने बाजारपेठ खुल्या झाल्या मात्र अद्याप राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे संबंधितांना सरकारविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली आहे. यात आता ‘ठाकरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे.
सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. ( कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही ! ) @CMOMaharashtra @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @SandeepDadarMNS @rajupatilmanase @abpmajhatv @ibnlokmat @TV9Marathi
— Abhijit Panse (@abhijitpanse) August 21, 2021
आपण सारेच जाणतो कि, आधीच कोरोनामुळे जवळपास दीड वर्ष प्रार्थनास्थळे आणि सिनेमागृहे बंद आहेत. परिणामी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा नेते आणि अध्यात्मिक आघाडी, वारकरी संघटना उग्र तितक्याच आग्रही भूमिका दर्शवित आहेत. याशिवाय सिनेमागृहे बंद असल्यामूळे पोटापाण्याची सोय नसलेले कलाकार, तमाशा कलावंत आणि नाट्यक्षेत्रातील कलाकारांची आर्थिक व मानसिकस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आता दिग्दर्शक, अभिनेते, कलाकार आणि क्षेत्रसंबंधित इतर मंडळी सरकारबाबत आक्रमक होताना दिसत आहेत.
अलीकडेच मनसे चित्रपट कर्मचारी अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाट्य व चित्रपट गृह खुले करण्याविषयी सरकारला विनंती केली होती. यानंतर सरकारचे दुर्लक्ष पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी आपला राग उपहासात्मक वक्तव्यातून व्यक्त केला आहे. पानसेंनी ट्विटरवर लिहिले कि, ‘सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही!, असा उपहासात्मक टोला राज्य सरकारला लगावत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. इतके सगळे झाल्यानंतर आता ठाकरे सरकारला जाग येणार का? या प्रश्नावर राज्य सरकार लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Discussion about this post