Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सात वर्षांपूर्वीचा ‘तो’ क्षण आजही अमृता- हिमांशुसाठी अविस्मरणीय; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Himanshu_Amruta
0
SHARES
23
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे गेले काही महिने अभिनेत्री अमृता खानविलकर फारच चर्चेत राहिली आहे. या चित्रपटातील तिच्या चेहऱ्यावरील हाव भाव, तिची नृत्य कला, अभिनय सारं काही अव्वल आहे यात काहीच शंका नाही. या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अमृताला मनसोक्त थिरकताना पाहिलं. पण ती पुन्हा एकदा म्हणण्याचे कारण म्हणजे ७ वर्षांपूर्वी अशीच बेफाम आणि तन मन झोकून ती नाचली होती. ज्याचा संपूर्ण मनोरंजन विश्वाने टाळ्या वाजवून गौरव केला होता. ७ वर्षांपूर्वीचा हा क्षण ना अमृता विसरली.. ना हिमांशु.. ना प्रेक्षक आणि ना ‘नच बलिए’चा मंच..

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

‘नच बलिए’ हा एक डान्सिंग रिऍलिटी शो आहे. या शो’च्या सातव्या सीझनमध्ये अमृता आणि तिचा पती हिमांशू या दोघांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होत. आपले अप्रतिम नृत्य सादर करीत त्यांनी हा शो जिंकला होता. हि गोष्ट आहे ७ वर्षांपूर्वीची. या दिवशी अमृताच जग बदललं होत कारण तिला एक उत्तम नृत्यांगना म्हणून सगळ्यांनीच स्वीकारलं होत. त्याचीच आठवण अमृताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. बरोबर २० जुलै २०१५ रोजी ‘नच बलिए सीजन ७’ या शोचा ग्रँड फिनाले झाला होता आणि अमृता खानविलकरने तिचा पती हिमांशू मल्होत्रासोबत विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून ३० लाख रुपये आणि होंडा जॅज कार देऊन गौरविण्यात आले होते. शिवाय प्रायोजकांनी वेगळा ५ लाखांचा चेकही दिला होता. याच दिवसाची आठवण अमृताने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

नच बलिएचा सातवा सीझन अमृता आणि हिमांशूच्या जोडीने अक्षरशः गाजवला होता. त्यामुळे हा सीजन प्रेक्षकांच्या चंगळच लक्षात राहिला असेल. सात वर्षांपूर्वी नच बलिएच्या सातव्या सिजनमध्ये अमृता- हिमांशू विजेते तर नंदीश-रश्मी पहिले रनरअप आणि उपेन-करिश्मा दुसरे रनरअप ठरले होते. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलंय कि, त्यावेळच्या रनरअपच्या जोड्या आता राहिल्या नाहीत. त्यांची नाती तुटली. अमृता आणि हिमांशूनं या शोच्या आधी लग्न केलं होतं. त्यावेळी ते नवदाम्पत्य होतं.’ हि आठवण जितकी अमृता आणि हिमांशू साठी खास आहे तितकीच प्रेक्षकांसाठी खास आहे हे कमेंट बॉक्समधून समजते.

Tags: Amruta KhanvilkarHimanshu MalhotraInstagram Postnach baliyeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group