हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ नव्या फॉरमॅटसह या शोला फक्त एक आठवडा उलटला आहे. या एका आठवड्यात प्रत्येकाने आपले वेगवेगळे रंग दाखवले आहेत. दरम्यान काल एक आठवड्यानंतर या शोमधील पहिलं वहिलं एलिमिनेशन झालं आणि एका स्पर्धकांचा प्रवास संपला. या पूर्ण आठवड्यात अनेकांची भांडण झालं अनेकांचे वाद झाले. त्यामुळे ‘संडे का वॉर’मध्ये करण जोहरने सगळ्यांची शाळा घेतली. या आठवड्यात राकेश बापट, शमिता शेट्टी आणि उर्फी जावेद हे तिघे नॉमिनेट झाले होते आणि प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर उर्फीचा प्रवास थांबला.
https://www.instagram.com/p/CSoEQQwjqAa/?utm_source=ig_web_copy_link
आतापर्यंत शो मधील स्पर्धकांनी दंगा केला कि मग मास्तरांप्रमाणे सलमान खान बिग बॉस हाऊस मध्ये शाळा घेताना दिसायचा. यानंतर आता फॉरमॅट बदलल्यानंतर बिग बॉस ओटीटीमध्ये करण जोहरने दिव्या अग्रवालला चांगलेच खडसावले. तू इथे स्वत:च्या मर्जीनं आली आहेस. तुला कुणीही इथे येण्यासाठी बळजबरी केलेली नाही. तेव्हा बळजबरीनं इथे आलीस असे म्हणू नकोस, अशा कडक शब्दांत दिव्याला चांगलेच झापण्यात आले. यानंतर, करणने प्रतिक सेहजपालला विचारले कि, असं काय झाल की अचानक तुझी वागणूक शोमध्ये बदलली. कोणत्या प्लॅननिशी तू शोमध्ये आलायस? यावर मी असाच आहे, असे प्रतिक म्हणाला.
https://www.instagram.com/p/CSoCZ2piKE5/?utm_source=ig_web_copy_link
तर, गेल्या आठवड्यात नेहा भसीन आणि मूस जट्टाना या दोघींमुळे बिग बॉसच्या घरात दोन गट पडलेले दिसले. नेहा व मूस यांच्यात भांडी घासण्यावरून जोरदार भांडण झाले. या दरम्यान काही लोक अर्थातच नेहाच्या बाजूने तर काहीजण मूसच्या बाजूने ढाल आणि सपोर्ट म्हणून उभे राहिल्याचे दिसले. या भांडणानंतर नेहा भसीन अक्षरशः रडतानाही दिसली. या भांडणानंतर प्रतीक आणि निशांत सोडून उर्वरित सर्व स्पर्धकांनी नेहालाच सपोर्ट केला. या भांडणादरम्यान नेहा भसीन आणि प्रतिक यांच्यातदेखील तुरळक भांडणाचा एक अध्याय चांगलाच गाजला.
Discussion about this post