Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टायगर 3’ चित्रपटातील भाईजानचा फर्स्ट लूक आला समोर; फोटो पाहताच चाहते झाले कनफ्युज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित चित्रपट टायगर ३ ची प्रतिक्षा सर्व प्रेक्षक करत आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. दरम्यान सलमान आणि कॅटरिना ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणासाठी शुक्रवारी रशियाला रवाना झाले होते. त्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे आणि या या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील सलमान खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटाचे अॅक्शन सीक्वेन्स शूट सुरु असताना यामध्ये सलमान एका कारचा पाठलाग करणारा सिक्वन्स शूट होत होता. सलमानचा हा लूक चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला आहे या लूकमध्ये त्याला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.

https://www.instagram.com/p/CS1-5fwsJ-Y/?utm_source=ig_web_copy_link

सलमानच्या फॅन पेजनुसार, यावेळी तो कारचा पाठलाग करणारा सीन शूट करत होता. या फोटोमध्ये सलमानचा लुक अगदीच वेगळा आहे. यामध्ये त्याचे लांब तपकिरी केस आणि दाढी दिसत आहे. यासोबतच कपाळावर लाल पट्टी बांधली आहे. त्यामुळे सलमानला ओळखणं कठीण झालं आहे. त्याचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सलमान खानसोबत त्याचा भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वाणदेखील दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सलमानचे चाहते रशियात त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. सलमानचा लूक पाहून त्याचे चाहते चांगलेच कनफ्युज झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CS1-mj6McZr/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोंवर कमेंट करत युजरने लिहिले, भाईजान काय दिसताय, तर आणखी एका चाहत्याने लिहिले, २०२२च्या ईदला धमाका होणार. या चित्रपटाचे काही शूट मुंबईत केल्यानंतर चित्रपटाची टीम रशियाला गेली आहे. यानंतर या पुढील शूट ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीत होईल. अहवालांवर, इम्रान हाश्मी तुर्कीच्या वेळापत्रकातून चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल आणि त्या वर्षातला हा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट असणार आहे. टायगर पर्वातील हा तिसरा चित्रपट आहे. पहिला ‘एक था टायगर’, दुसरा ‘टायगर जिंदा है’ आणि तिसरा ‘टायगर ३’ असणार आहे.

Tags: first lookkatrina kaifSalman KhanShootTiger 3Viral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group