हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजतागायत मनोरंजन विश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहेच इतका सोनेरी कि त्याची झळाळी आजही तितकीच लख्ख आहे. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांना लाभलेल्या धाडसी आणि शूर सहकाऱ्यांबद्दल बोलावे तितके कमीच. पण आजतगायत आपण केवळ शौर्यगाथा पाहिल्या असतील. यावेळी एक प्रेमकथा पाहणार आहोत. इतिहास रचणाऱ्यांच्या आयुष्यातही होतं असं प्रेम ज्याने त्यांना कणखर बनवलं. अशीच एक प्रेमकथा ‘रावरंभा’च्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे.
View this post on Instagram
ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नसून या प्रेमकथेला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. शिवरायांप्रती असलेलं प्रेम, निष्ठा, भक्ती आणि समर्पणाची किनार या कथेला लाभली आहे. .इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला ठाऊक असतील पण सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात दडलेली अशी हि एक अनोखी प्रेमकथा आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. यामध्ये आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर ‘राव’ आणि ‘रंभा’ दिसत आहेत. सोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वार दिसत आहेत. या चित्रपटात मुळशी पॅटर्न फेम अभिनेता ओम भुतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत आहेत. तर छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे आणि प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत.
View this post on Instagram
‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून हि जोडी आपल्या भेटीस येत आहेत. ‘रावरंभा’ हा चित्रपट येत्या १२ मे २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून इतिहासातील हे मोरपंखी पान अलगद हळुवारपणे उलगडणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनुप जगदाळे यांनी केले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव यांचे तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. तसेच कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. याशिवाय गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीत लिहिले आहेत. ज्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे.
Discussion about this post