हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून टाकले आहे. एकीकडे वाद आणि दुसरीकडे कमाईचा वाढता वेग थांबायचे नाव घेईनाच. हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. शिवाय त्या मुलींना कसे दहशतवादी संघटनांमध्ये सामील केले गेले याची कथा आणि त्या मुलींची व्यथा यामध्ये दाखवली आहे. या चित्रपटाने एकीकडे सर्व मनोरंजन विश्व व्यापून टाकले आहे तर दुसरीकडे मी=निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाविषयी संकेत दिले आहेत.
नुकताच या सिनेमाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. आता या सिनेमाचा पुढचा भाग येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. या सिनेमाच्या सिक्वेलवर भाष्य करताना विपुल अमृतलाल शहा म्हणाले कि, ‘द केरला स्टोरी २’ बनवता येईल… कारण हा विषय अद्याप संपलेला नाही. मी आता लाइन चित्रपटाचा भाग नाही, पण तो विषय अजून संपलेला नाही हे नक्की. आम्ही ते विषय सर्वांसमोर आणू. तुम्ही काळजी करू नका’.
चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शहा यांनी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. जे तुफान चर्चेत आहे. विपुल शाह यांच्या या विधानानंतर ‘द केरला स्टोरी’चा दुसरा भाग येऊ शकतो, यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या सिनेमाचा खरंच दुसरा भाग येणार का? आणि येणार असेल तर तो कधी येणार..? आणि या आगामी सिनेमात काय दाखवणार..? आणखी वाद उफाळणार कि नव्या वादाला तोंड फुटणार..? हे लवकरच कळेल.
Discussion about this post