हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणं हि बाब अगदीच साधी सोप्पी आणि सरळ झाली आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण अंगी एक कला असेल तर लाखो फॅन्स सहज बनतील याची अनेको उत्तम उदाहरणे सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. कधी रेल्वेवर गाणारी रानू मंडल असेल तर कधी शाळेत गाणे गाणारा सहदेव. अगदी काहीच दिवसांपूर्वी सहदेव दिर्दो या लहान मुलाने शाळेत गायलेलया गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. यानंतर या मुलाला अशी काही फेम मिळाली कि आज सहदेव जणू एक सेलेब्रिटीच झाला आहे. त्यानंतर आता या गाण्याचे मालवणी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर हिट झालेलं लहानग्या सहदेवचं ‘बचपन का प्यार’ हे गाणं सोशल मीडिया युजर्सने ऐकलं नसेल असं होऊच शकत नाही. पण आता या गाण्याच्या धर्तीवर कोकणामधील काही तरुण कलाकारांनी पखवाज, टाळ, तबला यांच्या साथीने या गाण्याचे चक्क मालवणी व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर या मालवणी गाण्याची चर्चा चांगलीच गाजली आहे. हे मालवणी व्हर्जन ऑफ बचपन का प्यार एक सुसाट व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्याचे बोल अस्सल मालवणी असल्यामुळे तरुणाईत या गाण्याची भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे.
बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे या मालवणी गाण्याचे बोल असे काही आहेत कि तुम्ही मालवणी असण्याचीही गरज नाही. फक्त भावनाओं को समझो यार. या मालवणी व्हर्जनचे बोल पुढीलप्रमाणे आहेत. – ‘जाने मेरी जाने मन न्हानपणीचा प्रेम माझा इसरा नको जाऊ. ती हा माझी बाय गो, मी हा तुझो बाबलो,’ न्हानपणीचा प्रेम माझा इसरा नको जाऊ..! हे बोल आणि या तरुणांचे सादरीकरण इतके कमाल आणि धमाल आहे कि बस्स. अगदी काहीच वेळात हे गाणे इतके वायरल होत आहे कि ज्याच्या त्याच्या वॉट्सअँप स्टेटसवर हेच गाणे दिसत आहे.
Discussion about this post