Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टकाटक च्या यशानंतर लवकरच प्रदर्शित होणार टकाटक २

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in गरम मसाला, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ
Takatak Movie Poster
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड सीन्समुळे चर्चेत येणारे फार चित्रपट नाहीत. मात्र टकाटक हा चित्रपट त्यातील बोल्ड सीन्समुळेच सगळीकडे चर्चेत होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आता लवकरच टकाटक चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/CNb1H4oJm3L/?utm_source=ig_web_copy_link

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक २’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक २’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले. ‘टकाटक’ची कथा आताच्या तरूणाईवर आधारलेली होती. सोबतच या चित्रपटात एक सामाजिक संदेश देखील दडला होता, त्यामुळे ‘टकाटक २’ या चित्रपटाची कथा काय व कशी असेल? या चित्रपटात नेमके काय पहायला मिळेल? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीतबद्ध केले आहे. तर हजरत शेख वली या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘टकाटक २’मधील कलाकारांची नावे अजून तरी सांगण्यात आलेली नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Milind Zumber Kavde (@milindkavde)

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक २’च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. ‘टकाटक २’ मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर पुढील भाग बनवताना जबाबदारी आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना रूचेल, पटेल, भावेल असं काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांना नक्कीच आवडेल अशी खात्री मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे.

Tags: Marathi IndustryMilind kavadePathmesh ParabTakatakupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group