हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे चित्रीकरण थांबले आणि अनेको मालिका रखडल्या. पण आता जसे जसे निर्बंध शिथिल होत आहेत तसे तसे रखडलेल्या मालिका पूर्व पदावर येताना दिसत आहेत. इतकेच काय तर मनोरंजन विश्वाची गाडी पुन्हा रूळावर येतेय आणि नव्या मालिकांचा क्रमच घेऊन येतेय. होय.. सध्या झी मराठीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शिवाय या नवीन मालिकांचे प्रोमोदेखील प्रसारित झाले असून त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यातील एक मालिका म्हणजे, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’. याशिवाय माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद, ती परत आलीये या तीन मालिकादेखील लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही नवी कोरी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. येत्या ३० ऑगस्ट २०२१ पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. सध्या या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. तो पाहिल्यानंतर कुणाचीही उत्सुकता वाढणे अगदीच साहजिक आहे. तूर्तास मालिकेत अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत आहेत. तर मालिकेतील अन्य कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण प्रोमो पाहिल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांच्या यादीत उच्च स्थानावर असणार हे नक्की.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होणार म्हटल्यावर या वेळेवर प्रसारित होणारी ‘माझा होशील ना’ हि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका निरोप घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अमृता पवार ही छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा असणारी अभिनेत्री आहे.
स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत तिने काम केले आहे. ‘दुहेरी’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पुढे ती ‘ललित २०५’ या मालिकेत झळकली होती.
Discussion about this post