हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादं नाटक रंगभूमीचा जीव असतं. कारण हे नाटक रंगभूमीवर सादर करताना तिच्या आशीर्वादाने खुलत जात आणि प्रेक्षकांच्या मनात आपली जागा करत जातं. असंच एक विलक्षण अनुभव देणारं नाटक रंगभूमीवर अवतारण्यास सज्ज झालं आहे. नाट्यक्षेत्रातील मात्तबर जाणकारांसोबत युवा लेखक आणि दिग्दर्शकांची एक नवी फळी रंगभूमीला नवा साज देऊ पाहते आहे. यात लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर हे नाव अत्यंत चर्चेत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या साथीने ‘यू मस्ट डाय’ हे नवीन सस्पेन्स थ्रिलऱ नाटकं घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
प्रवेश आणि वरदा क्रिशन्स निर्मित ‘यू मस्ट डाय’ या नाटकाचा शुभारंभ येत्या १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. या नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे. तर ‘यु मस्ट डाय’ नाटकाचे लेखन नीरज शिरवईकर यांचे आहे. तर नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. जिथे पारदर्शकता असते तिथेच काही गुपीतंही असतात. या गुपितांचा मागोवा घेणारे गूढमय नाटक ‘यू मस्ट डाय’ आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे. या नाटकात एक रहस्य आहे ज्यामागे दडलेले वास्तव जाणून घेण्याची उत्सुकता शेवटपर्यंत कलाकार टिकवून धरतात.
या नाटकात शर्वरी लोहकरे, सौरभ गोखले, संदेश जाधव, नेहा कुलकर्णी, अजिंक्य भोसले, हर्षल म्हामुणकर, प्रमोद कदम, विनिता दाते, धनेश पोतदार ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर नाटकाचे श्रवणीय संगीत हे अशोक पत्की यांचे आहे आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. तसेच वेशभूषा मंगल केंकरे आणि रंगभूषा राजेश परब यांची आहे. या नाटकाला दिग्दर्शन सहाय्यक सुशील स्वामी व धनेश पोतदार असून नाटकाचे सूत्रधार संतोष शिदम आहेत.
Discussion about this post