हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| संपूर्ण सिनेसृष्टीतील अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित मानला जाणारा OSCAR सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यंदाचा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा 94 वा असून लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे अवघ्या सिनेसृष्टीचे लक्ष लागल आहे. या पुरस्कार सोहळ्याचे सध्या काऊंटडाऊन सुरू झाले असून फक्त काहीच तास शिल्लक राहिल्यामुळे कलाकारांच्या मनात धाकधूक सुरू झाली आहे. रविवार, दिनांक २७ मार्च २०२२ रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे हा सोहळा एक विशेष आकर्षण ठरेल. आपल्याला भारतात हा सोहळा २८ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल.
https://twitter.com/TheAcademy/status/1507824917282127873
० कोणाला मिळाले नामांकन..?
सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी हिंदुस्थानच्या ‘रायटिंग विथ फायर’ला नामांकन मिळाले आहे.
रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित ‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट दलित महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राच्या उदयावर प्रकाश टाकतो. यामध्ये मीरा आणि तिच्या सहकारी मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे.
याशिवाय हॉलीवूड अभिनेता बेनेडिक्ट पंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत.
तर वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटालादेखील १० सर्वोत्कृष्ट नामांकने मिळाली आहेत.
० कोणात रंगणार जिंकण्याची चुरस..?
१) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभाग
‘द हँड ऑफ गॉड’,
‘लुनानाः अ याक इन द क्लासरूम’,
‘द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड ‘,
‘ड्राईव्ह माय कार’
‘फ्ली’
या चित्रपटांना नामांकन जाहीर झाले आहे. शिवाय हे चित्रपट तोडीचे असल्यामुळे यांमध्ये जिंकण्याची चुरस रंगेल.
२) सर्वोत्कृष्ट चित्रपट विभाग
‘बेलफास्ट’,
‘कोडा’,
‘डोन्ट लूक अप’,
‘डय़ून’,
‘ड्राईव्ह माय कार’,
‘किंग रिचर्ड’,
‘लिकोरिस पिझ्झा’,
‘नाईटमेअर अॅली’,
‘द पॉवर ऑफ द डॉग’
‘वेस्ट साइड स्टोरी’
या चित्रपटांना नामांकने मिळाली असून यापैकी कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Discussion about this post