Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जातीभेदानं- धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं..’; ‘त्या’ मुस्लीम बांधवांचा फोटो शेअर केलेली किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
3.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच एक शिकवण आणि सकारात्मक विचार देऊ करताना दिसतात. अनेकदा ते सामाजिक, कलाविश्वाशी संबंधित आणि अगदी राजकीय विषयांवरही मत मांडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेली संत तुकारामांच्या पालखीची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती आणि यानंतर आता आषाढी वारीच्या निमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. संत तुकारामांच्या पालखीला चकाकी देणाऱ्या मुस्लीम बांधवाचा फोटो शेअर करत त्यांनी हि पोस्ट लिहिली आहे. पाहुयात ते काय म्हणालेत..,

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लय जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकणारा चांदीचा रथ झळकायला लागलाय… चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी! देहूतल्या देऊळ वाड्यात कमर भैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत’.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो, असं या कारागीरांचं म्हणणं हाय. रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आणि शुभ्र, लख्ख झळाळी आणली…तशी लोकांची जातीभेदानं- धर्म द्वेषानं काळवंडलेली मनं घासून पुसून स्वच्छ करण्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हॉट्स अप फॉरवर्डमध्ये नाय गड्याहो. आजच्या नासलेल्या भवतालात, ”भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आणि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय!’ किरण माने यांची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group