Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गोविंदाच्या ‘हिरो नंबर 1’चा रिमेक येणार; ‘या’ अभिनेत्याची वर्णी लागणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Hero No 1
0
SHARES
642
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा ९० चा काळ गाजवलेला डान्सिंग स्टार गोविंदाचं फॅनफॉलोईंग आजही जबरदस्त आहे. त्याचे जवळजवळ सगळेच चित्रपट हिट पे सुपरहिट ठरले आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘हिरो नंबर १’. या चित्रपटापटात गोविंदासोबत अभिनेत्री करिष्मा कपूरने स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता आणि तुफान गाजलाही होता. आजही या चित्रपटाची एक वेगळंच क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. नुकताच या चित्रपटाचा २५ वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे. या निमित्ताने ‘हिरो नंबर १’ च्या रिमेकची घोषणा करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

‘पिंकविला’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हिरो नंबर १’ या सुपरहिट चित्रपटाचा लवकरच रिमेक येणार आहे. तसे कामदेखील सुरु करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे यावेळी हा चित्रपट अॅक्शन पॅक फॅमिली कॉमेडी ड्रामा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक वेगळीच मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. इतकेच नव्हे तर मिळालेल्या माहितीनुसार, जॅकी भगनानी आणि जगन शक्ती मिळून हा चित्रपट तयार करणार आहेत. ‘हिरो नंबर १’च्या सिक्वेलचे दिग्दर्शन जगन शक्ती तर निर्मिती जॅकी भगनानी करणार आहेत. तसेच या चित्रपटातील मुख्य भूमिका कोण निभावणार असा मोठा प्रश्न समोर असताना एका अभिनेत्याच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा आणि करिष्मा यांच्या सुपरहिट ‘हिरो नंबर १’ या चित्रटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इतकेच नव्हे तर निर्मात्यांना या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करायचे आहे आणि म्हणून या चित्रपटाचे बरेच भाग परदेशात चित्रित केले जाणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात येत्या वर्षात अर्थात २०२३मध्ये करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचे जोरदार काम सुरु आहे. तसेच लवकरच या चित्रपटातील इतर कलाकारांचीदेखील माहिती दिली जाईल.

Tags: govindaHero No 1Instagram Posttiger shroffviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group