हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण लग्नासाठी एखाद्या व्यक्तीला भेटत आहात? ती व्यक्ती कशी आहे याबद्दल काहीच कल्पना नाही? आपल्यासाठी ती योग्य आहे की नाही याची चिंता वाटते? आणि आपल्याला भेटणारी व्यक्ती ही खरंच आपल्यासाठी “राईट वन” आहे का ? तुमच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आले आहेत, दिशांत आणि अवनी ज्यांच्या भूमिका काहे दीया परदेस फेम रिषी सक्सेना आणि बिग बुल चित्रपटाची अभिनेत्री लेखा प्रजापती यांनी साकारलेल्या आहेत. ही नवीन आणि सुंदर रोमँटिक शॉर्टफिल्म २५ जून रोजी एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे.
अगदी २७ मिनिटांच्या या चित्रपटात आजच्या तरुणांच्या ‘अरेंज मॅरेज’बद्दल असलेल्या चिंता आणि गैरसमजांचे वर्णन केलेले आहे. आपल्याला भेटणारी व्यक्ती ही खरंच ” राईट वन” असली तर मग आपण अरेंज मॅरेज करतोय, की लव्ह मॅरेज याने फारसा फरक पडत नाही. लग्नासाठी पालकांकडून एकमेकांना भेटायला भाग पाडलेले दिशांत आणि अवनी एकमेकांबद्दलच्या त्यांच्या कल्पना, विवाहाबद्दल असलेले विचार, दोन पिढ्यांमध्ये असलेले मतभेद दर्शविणारा हा चित्रपट आणि आजच्या तरुणाईचा पालकांपेक्षा तंत्रज्ञानावर – डेटिंग अॅप्स आणि वेबसाइटवर विश्वास असे अनेक पैलू या चित्रपटातून दाखवले आहे.
या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन आगामी आणि प्रतिभावान दिग्दर्शक सागर लढे यांनी केले असून चंद्रकांत हिरे आणि ब्लॅकबोर्ड मोशन पिक्चर्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक सागर लढे यांना संगीत निर्माता म्हणून विश्वेश वैद्य, पटकथा लेखक म्हणून समीर मानेकर, सिनेमॅटोग्राफर म्हणून अक्षय राणे, सहयोगी व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जय चट्टर यांच्यासह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारा उत्कर्ष नेमाडे आणि अन्य क्रू मेंबर या सर्वांनी मिळून सहाय्य केले आहे. एमएक्स प्लेअर वर ही शॉर्ट फिल्म २५ जून रोजी प्रदर्शित झालेली असून, मोफत दाखवली जात आहे.
Discussion about this post