Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माहेरची साडी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार..?; अभिनेत्री अलका कुबल यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 25, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maherchi Sadi 2
0
SHARES
240
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी काही ओळख निर्माण केली आहे कि आजही स्त्री वर्गात त्यांची क्रेझ कायम आहे. आजतागात अनेक चित्रपटांनी सिनेसृष्टी गाजवली. पण अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने एकेकाळी संपूर्ण सिनेसृष्टी व्यापून टाकली होती. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा भुरळ घातली होती. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी साकारलेली सून प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून केली. हा चित्रपट 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि यानंतर आता त्याचा पुढचा भाग म्हणजेच ‘माहेरची साडी २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर (@kokanheartedgirl)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘झी मराठी चित्र गौरव पुरस्कार’ या सोहळ्याची तुफान चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात अभिनेत्री अलका कुबलदेखील हजर राहिल्या होत्या आणि त्यांनीच आगामी ‘माहेरची साडी २’ याविषयी माहिती दिली. यावेळी अलका कुबल यांना ‘माहेरची साडी २’मध्ये आता त्या सासूच्या भूमिकेत सुनेचा छळ करताना दिसणार का..? असा एक मिश्किल सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले कि, ‘मला देखील या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे कळले आहे’. इतकेच म्हणून त्या थांबल्या आणि अजुन अधिक अशी कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही. या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळे दुसरा भाग येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

विजय कोंडके यांनी दिग्दर्शित १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. या चित्रपटामध्ये अलका कुबल यांच्यासह दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, जयश्री गडकर, भालचंद्र कुलकर्णी, जयराम कुलकर्णी, अजिंक्य देव आणि उषा नाडकर्णी या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘माहेरची साडी’ या चित्रपटात अलका कुबल यांनी छळ सहन करणाऱ्या सुनेची भूमिका केली होती आणि त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी जाच करणाऱ्या सासूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे कथानक आणि गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली.

Tags: Alka KubalAwards CeremonyInstagram PostMarathi ActressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group